आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावड यात्रेतून युवक होतात मॅनेजमेंटच्या दृष्टीने ‘स्मार्ट’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एखादी क्रिकेट मॅच जिंकण्यासाठी जे काही टीमला आवश्यक असते, ते सर्व अकोल्यातील कावड यात्रा तरुणांना शिकवते. मन पक्क असेल तर शरीरही साथ देते, अशी मोलाची शिकवण या यात्रेतून मिळते. केवळ एक दिवसाचा हा धार्मिक उत्सव दैनंदिन जीवनात प्रेरणा देणारा आहे. जीवनातील ध्येय निश्चित करण्यापासून तर ते वेळेवर पूर्ण करण्याची शिकवण आपसूक देते. ही एक दिवसाची शिकवण अडचणीच्या प्रसंगी नुसती आठवली तरी एखाद्या वेळेस आलेले नैराश्य दूर करण्याचे बळ मिळण्यास पुरेशी आहे. कावड यात्रेत सहभागी झालेल्या उत्साही तरुणांच्या या बोलक्या प्रतिक्रिया.

प्लॅनिंग हा व्यवस्थापनातील पहिला फंडा, या कावड यात्रेतून मिळतो. किती घागरींना किती दोरी लागेल, किती घागरी किती बल्ल्यांना लटकवता येतील, ही सर्व कावड उचलण्यासाठी किती युवक लागतील, हे सर्व प्लॅनिंग करावे लागते. कावडधारी युवक कुठे जेवणार, किती पिण्याचे पाणी लागेल इथपर्यंत सर्व प्लॅनिंगमध्ये येते. प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींवर जबाबदारी सोपवली जाते. याला मॅनपॉवर सिलेक्शन व मॅनेजमेंट म्हणतात. या मॅनपॉवरला डायरेक्शन देण्यासाठी कुणीतरी लागतो. डायरेक्शन देताना त्यावर कंट्रोल ठेवणारा लीडर या कावड यात्रेत आपसूक तयार होतो. त्या लीडरच्या सांगण्यावरून कावड चालते, थांबते, वळते सर्व काही होते. हे सर्व झाल्यावर टास्क ठरवला जातो, र्शी राजराजेश्वर मंदिरात दुपारी 1 पर्यंत पोहोचण्याचा. त्यादृष्टीने रात्री गांधीग्राम येथून पावले उचलायला सुरुवात होते. रस्त्यातील सर्व अडथळे पार करत सहकारी कमी पडला तर त्याला मदत करण्याचे कोऑर्डिनेशन टीममध्ये तयार होते. राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक हे या सर्व टीमचे सांघिक लक्ष्य असते.

ही कावड यात्रा मैत्रीचा, सहकार्याचा, संकटात लढण्याचा आणि मुख्य म्हणजे लक्ष्यापर्यंत निर्धारित वेळेत पोहोचण्याची शिकवण देते. या यात्रेतून शहरातील विविध भागातील नागरिकांमध्ये एकोपा निर्माण होतो. आपत्तीच्या वेळी सहकार्‍यास मदत करण्याचे गुण अंगी येतात. हे सर्व शिकण्यासाठी कुठल्याही मॅनेजमेंट कॉलेजमध्ये जाण्याची गरज भासत नाही. ही कावड यात्रा जीवनातील कठीण प्रसंगी मदत करणारी आहे.

श्रद्धेचे बळ
धावतीत ध्यान अर्थात ट्रान्सिडेंटल मेडिटेशनच्या माध्यमातून जीवनातील आस्था (बिलिफ सिस्टिम) वृद्धिंगत केली जाते. या माध्यमातून विश्वास निर्माण होतो. उत्सवाने वर्षभरातील आवाहन आणि समस्या सोडवण्यासाठी मदत मिळते. कलाकार, वैज्ञानिक किंवा खेळाडू घडवण्यासाठी जो क्रेझिनेस (एखाद्या गोष्टीसाठी झपाटणे) तो या कावड यात्रेतून निर्माण होतो. ’’ प्रा. सतीश फडके, युवकांचे मार्गदर्शक.