आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी नोंदणीने गाठला साडेपाच हजारांचा आकडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्थानिक संस्था कर (एलबीटी) नोंदणीशिवाय महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या 25 व्यापार्‍यांची अद्यापपर्यंत एलबीटी विभागात सुनावणी झाली आहे. एलबीटी नोंदणीमध्येही वेग आला असून, नोंदणीने साडेपाच हजारांचा आकडा गाठला आहे.
सप्टेंबर महिन्यापासून महापालिका क्षेत्रात एलबीटी लागू झाला असून, प्रत्येक व्यापार्‍याला एलबीटीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी न करता व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. एलबीटी नोंदणीशिवाय महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या 60 व्यापार्‍यांना एलबीटी विभागाने नोटीस बजावली आहे. या व्यापार्‍यांची 5 डिसेंबरपासून एलबीटी विभागात सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण 25 व्यापार्‍यांची सुनावणी झाली आहे. सुनावणीत दोषी व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे. नोंदणी न करता व्यवसाय करणारे, दुसर्‍याच्या नावावर माल मागवणारे व विना बिल माल आढळणार्‍या व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एलबीटी विभागाने कारवाईला प्रारंभ केल्यापासून नव्याने एलबीटी नोंदणी करणार्‍यांची संख्या वाढली आहे. शहरातील पाच हजार 510 व्यापार्‍यांची एलबीटी नोंदणी झाली आहे. त्यापैकी तीन हजार 900 व्यापारी व्हॅट नोंदणीकृत आहेत.
अन्यथा दंडात्मक कारवाई
एलबीटी नोंदणीशिवाय शहरात व्यापार्‍यांना व्यवसाय करता येत नाही. व्यापार्‍यांनी नोंदणी करूनच शहरात व्यवसाय करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कैलास पुंडे, उपायुक्त, एलबीटी विभाग, मनपा, अकोला.
आतापर्यंत शहरातील 25 व्यापार्‍यांची झाली सुनावणी