आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमविवाह करून 'ते' आले संरक्षण मागण्यासाठी खदान पोलिसांना शरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तीन वर्षांपूर्वीच्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले अन्् त्यांनी आई-वडिलांच्या चोरून प्रेमविवाह करण्याचे ठरवले. प्रेमविवाह केलाही. मात्र, आता घरी तोंड कसे दाखवायचे म्हणून दोघांनीही खदान पोलिस ठाणे गाठले. आता आम्हाला संरक्षण द्या आणि आमच्या घरच्यांना तुम्हीच सांगा म्हणून विनवणी केली. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार तपासले आणि मुलीच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलावले. आई, वडील, आजोबा, भाऊ वर्ध्याहून ठाण्यात आले तर खरे. मात्र, विवाहित मुलीने त्यांची भेट नाकारली.

जून रोजी खदान पोलिस ठाण्यात २४ वर्षीय युवक १९ वर्षीय युवती दाखल झाले. साहेब, आम्ही प्रेमविवाह केला, त्याची नोंद घ्या आणि आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी पोलिसांकडे करू लागले. पोलिसांनी कायदेशीर लग्न केल्याचे तपासून पाहिले. त्यानंतर दोघेही सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांना फोन करून माहिती दिली. तिकडे मुलीचे आईवडील मुलीचा शोध घेतच होते. पोलिसांनी मुलीने लग्न केल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. गुरुवारी संध्याकाळी मुलीचे आई-वडील ठाण्यात आले आणि थरथरत्या आवाजात बोलू लागले. पोलिसांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर पोलिसांनीच मुलीला फोन करून आई-वडिलांना भेटण्यास येण्याचे सांगितले. मात्र, ती मुलगी आई-वडिलांना भेटण्यास राजी नव्हती. काकुळत्या नजरेने आई, वडील, भाऊ, आजोबा उशिरापर्यंत मुलीच्या भेटीसाठी ठाण्यातील एका झाडाखाली ताटकळत होते. मात्र, मुलगी आलीच नाही.

यवतमाळला मामाकडे असताना झाली ओळख
वर्धायेथील मुलगी तिच्या मामाच्या गावी यवतमाळला शिकायला होती. तेथे अकोला येथील एक युवक शाळेत शिकत होता. या वेळी मुलीची आणि युवकाची ओळख झाली. मामाला मुलीच्या वागण्यावर संशय आल्यामुळे त्यांनी मुलीला वडिलांकडे पाठवले. त्यानंतर हे दोघेही फोनवरून संपर्कात होते.