आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची अत्‍यावश्‍यक अग्निशमन सेवाही धोक्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या अग्निशमन विभागात मानसेवी तत्त्वावर कार्यरत २६ फायरमन यांना साडेतीन महिन्यांपासून कामाचे आदेश नाहीत. कामाचे आदेश नसतानाही हे कर्मचारी आपली सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यास जीवित वित्त हानी रोखणारा अग्निशमन विभागच अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे असे झाल्यास एखादवेळी गंभीर परिस्थिती उद््भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेतील तांत्रिक तसेच अतांत्रिक पदे रिक्त आहेत. ही पदे मंजूर असतानाही अद्याप भरल्या गेलेली नाहीत. त्यामुळे मागील १४ वर्षांपासून १५० पेक्षा अधिक अभियंते, अधिकारी, कर्मचारी मानसेवी म्हणून कार्यरत आहेत. या मानसेवींना दर सहा महिन्यांनी कामाचे आदेश दिले जातात. मानसेवी कर्मचाऱ्यांचे कामाचे आदेश ३० ऑगस्टला संपुष्टात आले. परंतु, त्यानंतर मानसेवींना कामाचे आदेश दिले नाहीत. या मानसेवींमध्ये फायरमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. महापालिकेतील इतर मानसेवींनी तीन महिने विनाआदेशाने सेवा दिल्यानंतर कामावर येणे बंद केले आहे. परंतु, अग्निशमन विभागात मानसेवी म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपली सेवा सुरू ठेवली आहे. परंतु, हे मानसेवी विनाआदेशाने किती दविस काम करणार? त्यामुळे कंटाळून या मानसेवींनी काम बंद केले तर अग्निशमन विभाग चालवायचा कसा? असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित होणार आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तर जबाबदार कोण?
मानसेवीकामाचे आदेश नसताना फायरमन म्हणून काम करत आहेत. आग विझवताना एखादवेळी मानसेवी फायरमनसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तर ३२ कर्मचारी राहतील
मानसेवींनीकाम बंद केल्यास अग्निशमन विभागात कायम आस्थापनेवरील केवळ ३२ कर्मचारी कार्यरत राहतील. या ३२ कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी, आजारी रजा, किरकोळ रजा गृहीत धरल्यास दररोज किमान दहा कर्मचारी सुटीवर राहतील. त्यामुळे खऱ्या अर्थाने २० अथवा २२ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तीन पाळीत अग्निशमन विभागाला कामकाज चालवावे लागणार आहे.
२६ मानसेवी
अग्निशमनविभागात २६ मानसेवी कर्मचारी कार्यरत आहे. यात वाहनचालक तर २१ फायरमन, सुरक्षा रक्षक, क्लीनर म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे फायरमन म्हणून हे मानसेवी कार्यरत असले तरी यांना विशेष प्रशिक्षण दिले नाही.
मानसेवी कार्यरत
मानसेवीकर्मचाऱ्यांना कामाचे आदेश मिळण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे. इतर विभागातील मानसेवींनी सेवा बंद केली असली तरी अग्निशमन सेवा अत्यावश्यक असल्याने मानसेवी कामाचे आदेश नसतानाही अद्याप सेवा देत आहेत.'' {रमेश ठाकरे,अग्निशमनअधिकारी.