आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महावितरणकडून 20 झाडांची कत्तल, यशवंत ले-आऊटमधील नागरिकांमध्ये असंतोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, यावर भर देण्यात येत असताना शुक्रवारी गोरक्षण रोडवरील चार बंगल्यांच्या पाठीमागे असलेल्या यशंवत ले-आऊटमध्ये विजेच्या तारांना अडथळा येतो, या नावाखाली 20 झाडांची कत्तल महावितरणने केली.

यशवंत ले-आऊटमध्ये गणेश हाउसिंग सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये दोन ठिकाणी खुल्या जागा आहेत. या जागांच्या दोन्ही बाजूस वृक्षांची रांग आहे. या जागांवरून विद्युत तारा गेल्या आहेत. या तारांना झाडांचा स्पर्श होतो, म्हणून महावितरणने झाडांच्या फांद्यांची तोड न करता बुध्यांपासून पाच ते सात फुटाच्या अंतरावरून 20 झाडांची कत्तल केली आहे. मात्र, याच विद्युत तारांच्या रांगेत लिंबाच्या झाडाची फांदी विद्युत तारांवरून गेली आहे. ती फांदी कधीही जीवघेणी ठरू शकते. या फांदीवर कुर्‍हाड न चालवता महावितरणने अन्य झाडांची तोड केल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नागरिक म्हणतात..
शहरातील यशवंत ले-आऊटमधील विजेच्या तारांना अडथळा ठरणारी झाडे महावितरण कंपनीतर्फे तोडण्यात आली.

वीजपुरवठा खंडित होतो
हवेमुळे झाडांचा तारांना स्पर्श होतो. त्यामुळे स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित होतो. विद्युत तारांखाली आलेल्या झाडांची तोड करणे आवश्यक असते, नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू नये म्हणून झाडांची तोड करणे आवश्यक आहे.’’
विकास आढे, पीआरओ महाविरण

कंपनीच्या लोकांनी ऐकले नाही
विजेच्या तारांना झाडे टेकत असल्याने झाडांच्या फांद्या तोडा, असे आम्ही महावितरणच्या लोकांना सांगितले. मात्र, त्यांनी आमचे ऐकले नाही.’’ दिनेश बाहकर, रहिवासी.

फांद्यांची तोड करायला हवी होती
उन्हाळय़ाची सावली हरवली आहे रात्री-बेरात्री आम्ही या झाडांना पाणी घातले. झाडांच्या फांद्यांची तोड करायला हवी होती. मात्र, पूर्ण झाडे तोडली हे चुकीचे आहे.’’
पवनेश अग्रवाल, रहिवासी