आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड; पोलिसांचे पथक खाली हात परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडप्रकरणी आरोपीच्या शोधात मध्यप्रदेश येथील खकनार येथे गेलेले पोलिस पथक खाली हात परत आले आहे.

सिद्धेश्वर देशमुख यांची हत्या करण्यासाठी वापरलेल्या पिस्तूल विक्रेत्याच्या शोधासाठी खदान पोलिसांचे पथक मध्यप्रदेशातील खकनार येथे गेले होते. पोलिसांच्या पथकाने खकनार येथे आरोपीच्या शोधासाठी मोहीम राबवली. मात्र, पोलिस पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. पोलिसांचे पथक खाली हातच परतले. मलकापूरचे सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांची आरोपी नीलेश सोळंके, मोहन मार्कंड या दोघांनी शस्त्राचा वापर करून हत्या केली होती.

हत्याकांडासाठी वापरलेले पिस्तूल खकनार येथून खरेदी करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. आरोपींना ज्यांच्याकडून पिस्तूल खरेदी केली, त्याच्या नावाची कल्पना नाही. ते केवळ चेहर्‍याने ओळखतात. त्यामुळे पिस्तूल विक्रेता आरोपीचा शोध घेण्यासाठी खदान पोलिस पथक खकनार येथे गेले होते. मात्र, पोलिसांना आरोपीचा थांगपत्ता लागू शकला नाही. खकनार हे शस्त्र तस्करीचे मोठे केंद्र आहे.