आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठीची आरक्षण सोडत निघणार मंगळवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापौरपदाच्या आरक्षणाची सात ऑगस्टला होणारी सोडत आता 12 ऑगस्टला होत आहे. महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापौरांचा अडीच वर्षांचा कालावधी पुढच्या महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणे आवश्यक आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सुमनताई गावंडे यांना सहा महिने तर मदन भरगड यांना तीन महिने अधिक मिळाले होते. महापौर ज्योत्स्ना गवई यांनाही किमान तीन महिने अधिक मिळतील, अशी चर्चा सुरू होती, परंतु मुदतवाढीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ही मुदतवाढ न्यायालयाने थांबवल्याने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अपेक्षित आहे. महापौरपदाचे आरक्षण सात ऑगस्टला होणार होते. सर्व तयारी झाली होती. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ही सोडत 12 ऑगस्टला घेण्यात येणार आहे.

2012 ला झालेली महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीनुसार झाली. त्यामुळे महापौरपदाचे आरक्षणही नव्याने होत आहे. पहिल्या टप्प्यात महापौरपद एसस्सी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले. आता खुला प्रवर्ग, खुला महिला प्रवर्ग, ओबीसी महिला, ओबीसी पुरुष आणि एसटी महिला व एसटी पुरुष या प्रवर्गातून एका प्रवर्गाला महापौरपदाची संधी मिळणार आहे.