आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola MLA Gopikishan Bajoriya's Against FIR Registered For Illegal Hording And Banner

अवैधरित्या होर्डिंग्ज आणि बॅनरप्रकरणी आमदार बाजोरिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अवैधरित्या होर्डिंग्ज आणि बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी बाजोरिया यांच्याविरुद्ध रविवारी रात्री वाजता पोलिसात तक्रार दिली.

शहराचे सौंदर्यीकरण वाढवून, त्याला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचणार नाही तसेच शहराचे विद्रूपीकरण करू नये, याबाबत महापालिकेच्या वतीने आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला दाद देता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी अवैधरीत्या होर्डिंग्ज आणि बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण चालवले आहे. त्यावर रविवारी महापालिकेच्या वतीने कडक भूमिका घेण्यात आली. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी नेहरू पार्कसमोरील एलबीटी ऑफिससमोर त्यांच्या प्रचाराचे अवैध फलक लावले. त्यावरून गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरुद्ध उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या वतीने गणेश प्रल्हाद ठाकरे यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सार्वजनिक मालमत्ताप्रती प्रतिबंधक कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे.