आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेचे संजय रायमुलकर सर्वाधिक श्रीमंत उमेदवार;प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे लाखोची संपत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहकर - मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज भरताना आपल्या पत्नीच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यात शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे ३८ लाख ५० हजार ४८२ रुपयांची मालमत्ता आहे.
आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे स्वत: जवळ जंगम मालमत्ता लाख हजार ४८२ इतकी रक्कम आहे. त्यात भारतीय स्टेट बँकेत ९४ हजार ७२ रुपये जमा असून, २० लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ आहे. तर २०० ग्रॅम सोने किंमत लाख लाख रोकड, पत्नी हंसा रायमुलकर यांच्या नावे एकूण १८ लाख ५० हजार रुपये असून, लाख ५० हजार रुपये रोकड १०० ग्रॅम सोने किंमत १२ लाख रुपये असे दोघांच्या नावे एकूण ३८ लाख ५० हजार ४८२ रुपयांची मालमत्ता आहे.
तसेच काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव घुमरे यांच्याकडे स्वत:चे रोकड ५० हजार रुपये ठेवी इतर १३ हजार ३२४ रुपये ,सुंदरखेड बँक अॉफ महाराष्ट्र मध्ये लाख २८ हजार ७९२ रुपये, ग्रॅम सोन्याची अंगठी १३ हजार ५०० रुपये, स्वत:जवळ रोकड ९० हजार रुपये, तर पत्नी सुनंदा घुमरे यांचेकडे रोकड १० हजार रुपये, बँकेत ठेवी लाख ६२ हजार २२३ रुपये, १९ हजार ५६ रुपये, तसेच लाख ४५ हजाराचा विमा, १० तोळे सोने लाख १० हजार असे पत्नीच्या नावे १४ लाख ३६ हजार स्वत:जवळ लाख ९९ हजार ५३२ अशी एकुण २० लाख ५५ हजार ९९ रुपयांची संपत्ती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अश्विनी आखाडे यांचेकडे स्वत:चे रोकड लाख २० हजार रुपये पती चरण अाखाडे यांचेकडे रोख लाख ६० हजार रुपये तर स्थावर मालमत्ता ३५ लाख रुपयांची आहे. एकूण मालमत्ता ३६ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. भाजप रिपाइंचे उमेदवार नरहरी गवई यांचेकडे अमडापूर येथील स्टेट बँकेत ठेवी ३४१० रुपये ,रोकड लाख रुपये ,सोने २१ ग्रॅम ४२ हजार रुपये तर पत्नी मंगला गवई यांचेकडे ५६ हजार रुपये तर २० ग्रॅम साेने किंमत२८ हजार रुपये असा एकूण लाख ९५ हजार रुपयांची संपत्ती आहे.