आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाने शहरात जाणवतोय डासांचा उपद्रव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अवकाळी पावसानंतर तापमानात वाढ होण्यास प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात डासांचा उपद्रव वाढला असून, एडिस, अँनाफिलीस, क्युलेक्स डासांच्या अंड्यांचेही प्रमाण वाढल्याचे फेब्रुवारी महिन्यात काही निवडक ठिकाणी पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले आहे. सरासरी डासांच्या अंड्यांचा हाऊस इंडेक्स हा 10 टक्क्यांच्या आत असावयास पाहिजे, मात्र तपासणी करण्यात आलेल्या गावांमध्ये तो 30 टक्क्यांच्या आसपास असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या आजारांचा संभाव्य धोका पाहता हिवताप कार्यालयाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

डासांची घनता अशी करतात निश्चित
डासांची घनता निश्चित करताना इनसेट कलेक्टर अर्थात कीटक समहारक तंत्राचा वापर केला जातो. त्यामध्ये प्रतिव्यक्ती, प्रतितास किती डास आढळले, त्या आधारावर डासांची घनता निश्चित केल्या जाते.