आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपाचे आयुक्त चौधरी यांची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेचे आयुक्त दीपक चौधरी यांची नाशिक जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आज बदली झाली. त्यांनी महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांना आयुक्त पदाचा प्रभार दिला. चौधरी यांनी नाशिक येथे रुजू होण्यासाठी प्रयाण केले आहे. ही संपूर्णत: प्रशासकीय स्वरूपाची बदली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आयुक्त म्हणून शंभरकर यांची आयुक्त पदावर नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.