आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Annual Income Go Vain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला महापालिकेला वार्षिक साडेबारा कोटींचा चुना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेच्या नियोजन व असमन्वयामुळे दरवर्षी महापालिकेला साडेबारा कोटींचा चुना लागत आहे. मालमत्ता विभाग व जलप्रदाय विभागातील असमन्वयामुळे हा फटका बसत आहे. दरवर्षी होणारा हा तोटा नेमका कुणामुळे होतो, याचा शोध प्रशासनाने घेण्याची गरज आहे. महापालिकेत मालमत्ताधारक व त्यांच्या नळजोडणीचा ताळमेळ नाही. घर व पाणीपट्टी हे मनपाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. याकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस येत असल्याचे चित्र आहे.

महापालिका हद्दीत एकूण घरांची संख्या ही 70 हजार 765 इतकी आहे तसेच शहरात मालमत्ता विभागाच्या नोंदीनुसार आठ हजार 102 व्यावसायिक प्रतिष्ठाने आहे. असे असताना किमान इतकीच नळजोडणी असणे आवश्यक आहे; पण असे महापालिकेत दिसून येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही वस्तुस्थिती असताना यावर कोणीच पुढाकार घेत सुधारणा करण्याचे धाडस करताना दिसत नाही. जलप्रदाय विभागाच्या नोंदीनुसार महापालिका हद्दीत एकूण घरगुती नळांची जोडणी संख्या ही 34 हजार 223 एवढी आहे. या आकडेवारीनुसार शहरातील एकूण मालमत्ताधारकांच्या संख्येच्या निम्मी संख्या ही नळजोडणीधारकांची आहे. पण, त्याचवेळी महापालिकेच्या मालमत्ता (कर) विभागात याविषयीची माहिती उपलब्ध झाली. कर विभागाद्वारे घरगुती पाणीकराची वसुली ही 27 हजार 232 मालमत्ताधारकांकडून होते. त्यामुळे इतर घरांची पाणी करवसुली का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. अशीच काय ती परिस्थिती व्यावसायिक नळजोडणीची आहे. जलप्रदाय विभागाकडे शहरात व्यावसायिक जोडणी असणार्‍या करदात्यांची संख्या ही 520 च्या वर आहे, तर मालमत्ता विभागात मात्र केवळ 400 व्यावसायिक हे व्यावसायिक दराने पाणी कर अदा करतात, असे दिसून येते. प्रत्यक्षात अनेक घरांना करांची आकारणी (असेसमेंट) न झाल्याने ते अद्याप कर अदा करत नाही. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांची व नळजोडणींची संख्या वाढणारी आहे. पण, गेल्या अनेक वर्षांत ही आकडेवारी निश्चित झाली नसल्याने महापालिकेला वर्षाकाठी सुमारे साडेबारा कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.


साडेबारा कोटींचा हिशोब
शहरात कर विभागाच्या आकडेवारीनुसार आठ हजार 102 व्यावसायिक मालमत्ताधारक आहे. यांपैकी केवळ सुमारे 400 जोडण्या या व्यावसायिक दराने पाणीपट्टी देतात. दरवर्षाला अर्धा इंच नळाच्या व्यावसायिक उर्वरित. पान 4 नळ जोडणीधारकाला सहा हजार रुपये पाणी कर द्यावा लागतो. अशा प्रकारे सात हजार सातशे व्यावसायिकांना दर वर्षाला सहा हजार रुपये वार्षिकप्रमाणे चार कोटी 62 लाखांची वसुली होईल. अशीच काय ती परिस्थिती घरगुती नळजोडणीची आहे. नोंदणी न झालेल्या 43 हजार पाचशे नळजोडणीधारकांकडून 1,800 रुपये प्रतिवर्षानुसार सुमारे सात कोटी 83 लाखांची वसुली शक्य आहे. अशी एकूण वर्षाला साडेबारा कोटी रुपयांची वसुली अद्याप होत नाही, याकडे कोणत्याही पदाधिकार्‍यांचे लक्ष नाही, हे विशेष.