अकोला - पाणीपुरवठायोजनेला तोट्यात आणणाऱ्या अवैध नळजोडण्या वैध करण्याच्या मोहिमेला काही प्रमाणात का होईना प्रतिसाद मिळत आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत ९२० नागरिकांनी
आपल्या अवैध नळजोडण्या वैध करून घेतल्या. एकीकडे ९२० नळजोडण्या वैध झाल्या तर दुसरीकडे या माध्यमातून प्रशासनाला ४३ लाख ७० हजार रुपयांचा महसूलही मिळाला.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वैध नळजोडण्यांची संख्या मालमत्तांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे योजनेवर दहा कोटी खर्च होतात तर पाणीपट्टी वसुली केवळ चार ते पाच कोटी होते. हा तोटा कमी करण्यासाठी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी विविध फंडे लढवले. थेट फौजदारी करून काही अवैध नळजोडणीधारकांना अटकही करण्यात आली, तर दुसरीकडे अवैध नळधारकांना आपल्या जोडण्या वैध करण्याचे आवाहनही केले.
जोडण्या वैध कराव्यात
हीयोजना अद्यापही सुरू असून, ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडण्या आहेत, त्या नागरिकांनी तीन वर्षाची पाणीपट्टी भरून नळजोडण्या वैध करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच दंडात्मक कारवाईपासून आपला बचाव करावा. '' दयानंदचिंचोलीकर, उपायुक्तमहापालिका, अकोला.