आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Has Two Commissioners ?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेला आता दोन आयुक्त?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी सोमनाथ शेट्ये यांची मनपा आयुक्त म्हणून बदली झाली होती. तर सहा फेब्रुवारीला झालेल्या १५ अधिका-यांमध्ये कोकण पुरवठा विभागाचे उपायुक्त मिलिंद गावडे यांची आयुक्तपदी बदली झाली. सोमनाथ शेट्ये यांची बदली अद्याप रद्द झाल्याने ते सोमवारी रुजू होणार आहेत. त्यामुळे नेमके आयुक्त कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डॉ. महेंद्र कल्याणकर यांची २० जानेवारीला बदली झाली. त्यानंतर वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेट्ये यांची चार फेब्रुवारीला आयुक्तपदी बदली झाली. सोमनाथ शेट्ये सोमवारी रुजू होणार होते. परंतु, सहा फेब्रुवारीला मिलिंद गावडे यांची आयुक्तपदी बदली झाली. त्यामुळे एकाच वेळी दोन आयुक्त मिळाले आहेत, तर मनपाचे नेमके आयुक्त कोण? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मिलिंद गावडे मूळ धुळे जिल्ह्यातील असून, महाराष्ट्र राज्य प्रशासन सेवेतील आहेत.

सोमवारी रुजू होणार
माझीआयुक्तपदी नियुक्ती फेब्रुवारीला झाली. ती अद्याप रद्द झालेली नाही. त्यामुळे मी सोमवारी रुजू होत आहे.'' सोमनाथशेट्ये