आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध नळजोडण्यांचा परिणाम; मनपाला मागील वर्षी तीन कोटी रुपयांचा तोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेलाएक हजार लिटर पाण्यासाठी एक रुपया ७५ पैसे खर्च करावे लागतात, तर नागरिकांकडून एक हजार लिटर पाण्याचे १४ रुपये घेतले जातात, तरीही महापािलकेला पाणीपुरवठा योजना तोट्यात चालवावी लागते. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, या मागे अवैध नळजोडण्या हे प्रमुख कारण मानले जात आहे.
एक दशलक्ष घनमीटर पाण्यासाठी दोन लाख दहा हजार रुपये महापािलका पाटबंधारे विभागाला देते. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात महापािलकेला पाणीपुरवठा योजना चालवण्यासाठी (कर्मचाऱ्यांचे वेतन देखभाल दुरुस्तीसह) कोटी ४६ लाख, ९२ हजार ४६१ रुपये खर्च आला, तर कोटी ८२ लाख ८८ हजार ४६८ रुपये पाणीपट्टीची वसुली झाली. परिणामी, पावणे तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
महापािलकेने या वर्षभरात एकूण २०.२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली. यापोटी महापािलकेला पाटबंधारे विभागाला ४२ लाख ४४ हजार रुपयांची पाणीपट्टी देणे गरजेचे होते. परंतु, प्रत्यक्षात महापािलकेने पाटबंधारे विभागाला या वर्षात केवळ २० लाख रुपये दिले, तर कर्मचाऱ्यांना केवळ नऊ महिन्यांचे वेतन दिले. ही बाब लक्षात घेता, तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पाटबंधारे विभागाचे २० लाख ही देणी पूर्ण दिली असती, तर महापािलकेला या योजनेसाठी वर्षाकाठी एकूण कोटी ६१ लाख रुपये खर्च करावा लागला असता. त्यामुळे झालेल्या खर्चातून उत्पन्न वजा केल्यास महापािलकेला एक दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्यासाठी १८ लाख ७० हजार रुपये, तर प्रती एक हजार लिटर पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १.८७ पैसे खर्च आला.
वर्षभरात सरासरी दरडोई ७० लिटर पाणीपुरवठा केल्याचा दावा महापािलकेकडून केला जातो. एक कुटुंबात पाच व्यक्ती गृहीत धरल्यास एका कुटुंबाला दररोज ३५० लिटर पाणी दिले जाते. (पाच दिवसांचे पाणी एकाच दिवशी दिले जाते.) वर्षाकाठी एका कुटुंबाला लाख २७ हजार ७५० लिटर पाणी दिले जाते. या मोबदल्यात एका कुटुंबाकडून (नळधारकाकडून) वर्षाकाठी १८०० रुपये पाणीपट्टी घेतली जाते. म्हणजेच एका नळधारकाला हजार लिटर पाणी घेण्यासाठी १४ रुपये मोजावे लागतात. दोन रुपयांना एक हजार लिटर पाणी घेऊन ते नागरिकांना १४ रुपयांत दिल्यानंतरही ही योजना तोट्यात कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नमुनेतपासणीवर खर्चच नाही
नागरिकांनाशुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी शहराच्या विविध भागांतील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले जातात. यासाठी या आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांची तरतूद केली. परंतु, त्यावर एक पैसाही खर्च केला नाही.