आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या ८२ लाखांचे नुकसान; जबाबदारांवर कारवाईची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्याप्रशासकीय कार्यकाळात फेरीवाल्यांकडून दहा रुपयांऐवजी दररोज १५ रुपये दैनिक परवाना फी आकारण्याच्या ठरावाची अंमलबजावणीसंबंधित विभागाने केल्याने महापालिकेचे डिसेंबर २०११ ते ११ नोव्हेंबर २०१४ यादरम्यान महापालिकेचे ८१ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर नुकसानभरपाईची कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर विनोद मापारी यांनी केली आहे.

डिसेंबर २०११ पासून दैनिक परवाना फी आकारण्याचा ठरावाची अंमलबजावणी होईल, असे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. परंतु, बाजार वसुली विभागाने प्रत्यक्षात चारचाकी, फेरीवाल्यांकडून १५ रुपयांऐवजी दहा रुपयेप्रमाणेच वसुली केली. तूर्तास फेरीवाले, ओटे, चारचाकी गाड्या यांची संख्या १५४० आहे. यानुसार पाच रुपये कमी वसूल केले, तर एक दिवसाचे ७७०० एवढे नुकसान होत आहे. त्यामुळे आतापर्यंत १०६० दिवसांचा विचार केल्यास महापालिकेचे ८१ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेला हा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर वसुलीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर विनोद मापारी यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने बाजार अधीक्षक विकास मुंगी यांना उपमहापौरांच्या तक्रारीवरून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

केवळ १५४० फेरीवाले
बाजारवसुली विभागाने केवळ पाच रुपये कमी घेऊन मनपाचे नुकसान केले नाही, तर विभागाच्या दप्तरी केवळ १५४० चारचाकी, फेरीवाले, ओटे आदींची संख्या आहे. प्रत्यक्षात मनपा क्षेत्रात पाणी पुरीच्याच हजारापेक्षा अधिक चारचाकी गाड्या आहेत. त्यामुळे अनेकांची नोंदच विभागाने केली नाही. त्यामुळे प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील सर्व हातगाडी रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करावे.'' विनोदमापारी, उपमहापौर