आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation, Latest News In Divya Marathi

महानगर सुधार समितीकडे पद येण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापौरपदाच्या 16 ऑगस्टला झालेल्या या सोडतीत अकोला महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव निघाले आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित निघाल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिकेतील पक्षीय बलात आता बदल झाल्याने महापौरपद भारतीय जनता पक्षप्रणीत महानगर सुधार समितीकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या पाच बंडखोर नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2012 ला झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने काँग्रेसने महाआघाडी स्थापन केली, तर भाजपने महानगर सुधार समिती स्थापन केली. भाजपचे बंडखोर स्वगृही परत आणण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नाही. त्यामुळे काँग्रेसने भारिप-बमसंला महापौरपद देऊन सत्ता हस्तगत केली. परंतु, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भाजपच्या महानगर सुधार समितीचे संख्या महाआघाडीच्या बरोबर आली आहे. महाआघाडी व महानगर सुधार समितीचे संख्याबळ 36-36 झाले आहे. परंतु, खर्‍या अर्थाने महाआघाडीचे संख्याबळ 31 आहे. पाच अपक्ष नगरसेवकांच्या गटाने तसेच अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे यांनी महाआघाडीला बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते कोणत्याही गटाला मदत करू शकतात. त्यामुळेच या सहा जणांच्या हातात सत्तेची सूत्रे आहेत. भाजपकडून उज्ज्वला देशमुख, वैशाली शेळके, संगीता अग्रवाल, सारिका जयस्वाल, करुणा इंगळे साफिया आझाद खान, निकहत अफसर कुरेशी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. परंतु, आता महापौरपद घेतल्यास विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागता येणार नाही. त्यामुळे दोन्ही तबल्यांवर हात ठेवणार्‍या नगरसेवकांची फसगत होत आहे.