आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation NCp Agitation For Development

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकासाचे झाले वाटोळे, विरोधकातील भाजप सुस्त; सत्ताधारी आंदोलनाच्या तयारीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेतील सत्तापक्ष, समस्या यांच्या विरोधात विरोधकांनी तीव्र आंदोलन करण्याची गरज होती. पण, विरोधकाची चुप्पी पाहता आता सत्तारूढ पक्षानेच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत सत्तेत सहभागी असलेल्या महाआघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सात दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत एल्गार पुकारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा मोह नाही. महापालिकेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले आहे. येत्या सात दिवसांत रस्त्यांची डागडुजी व मजबुतीकरणाच्या कामासह साफसफाई व दिवाबत्तीची कामे सुरू झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय तापडिया यांनी दिला आहे. महापालिकेच्या सत्तेत सहभागी असले तरी शहराचे वाटोळे झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आलेला दोन कोटी रूपयांची निधी इतरत्र खर्च करण्यात आला. याकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष नाही. शनिवार, 31 ऑगस्टला महापालिका आयुक्तांना निवेदन देत त्यांना शहराच्या समस्यांची माहिती देण्यात येईल. सात दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही, तर आयुक्तांना घेराव, प्रशासनातील अधिकार्‍यांना कोंडणे अशा स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. सत्तेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर येणार असल्याचे अजय तापडिया यांनी स्पष्ट केले आहे.

बेकायदा केबल टाकण्यास परवानगी देणे व मलिदा लाटण्याचे काम प्रशासन करत आहे. सत्तारूढ पक्ष प्रशासनावर ओरड करत आहे. ही बाब गंभीर असून, राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पातळीवर या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा पक्षाचे ज्येष्ठ नेते श्याम अवस्थी यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचा इशारा

सात दिवसांत रस्त्यांची डागडुजी, साफसफाई व दिवाबत्तीची कामे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा शहराध्यक्ष अजय तापडिया यांनी दिला.