आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation News In Divya Marathi

अकाेल्याच्या विकासासाठी मनपाच्या तिजाेरीत ठणठणाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - प्रशासनाने २०७ कोटी रुपये उत्पन्नाचे अंदाजपत्रक सादर केले असले, तरी प्रत्यक्षात महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न केवळ १२९ कोटी ९६ लाख (अंदाजे) एवढेच आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध देणींसाठी या अंदाजपत्रकात ७६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासह दैनंदिन खर्चही करावा लागणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महापालिकेच्या निधीतून शहरविकासासाठी खर्च करण्याची सोयच या अंदाजपत्रकात नाही. त्यामुळे शहराच्या विकासासाठी राज्य केंद्र शासनावरच अवलंबून राहावे लागणार आहे. महापालिकेच्या २०१५-२०१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी १५ एप्रिलचा मुहूर्त निघाला आहे. सत्ताधारी गटाच्या अंतर्गत कलहामुळे कोणतेही कारण नसताना २४ मार्चला ही सभा स्थगित करण्यात आली होती. या सभेत प्रशासनाने रिअॅलिस्टिक अंदाजपत्रक सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरसेवक रिअॅलिस्टिक अंदाजपत्रकाला मंजुरी देतात की, निव्वळ खर्चाची बाजू वाढवण्यासाठी फुगीर आकड्यांचे अंदाजपत्रक मंजूर करतात? याबाबत सर्वसामान्य नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
प्रशासनाने अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सत्ताधारी गटाने २४ मार्चला अंदाजपत्रकावर चर्चा करून मंजुरी देण्यासाठी सभा बोलावली. परंतु, कोणतेही कारण नसताना अंदाजपत्रकासारखी महत्त्वाची सभा स्थगित करण्यात आली. विशेष म्हणजे, या अंदाजपत्रकात महापालिकेवर नेमके किती दायित्व आहे? याची माहिती नसल्याचा ठपका ठेवून ही माहिती प्रशासनाने संकलित केल्यानंतर सभा घेतली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले, तर प्रशासनाने दायित्वाची माहिती तीन दिवसांत देण्याचे ग्वाही दिली होती. परंतु, त्यानंतरही सभा बोलावली गेली नाही. २०१५-२०१६ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्याने महापालिकेची अनेक कामे रखडली आहेत. यावर पर्याय म्हणून प्रशासनाने खर्च करण्यासाठी ३१ मार्च क्लोज केले नाही. यातून देयके काढण्याचा सपाटाही सुरू आहे. या सर्व प्रकारावर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षही चकार शब्द बोलण्यास तयार नाही. परंतु, आता अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी १५ एप्रिलचा मुहूर्त काढला असून, सकाळी ११ वाजता अंदाजपत्रकावर चर्चा केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेले २०७ कोटी उत्पन्नाचे अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केले आहे. अंदाजपत्रकात शहरविकासासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दायित्वाची माहिती अद्यापही परिपूर्ण नाही
महापालिकेवरदायित्व हे एका वर्षात झालेले नाही. महापालिका अस्तित्वात आल्यापासून दायित्व वाढत आहे. अंदाजपत्रकात दायित्वाची माहिती नाही, म्हणून यापूर्वी कधीही अंदाजपत्रकाची सभा स्थगित केल्या गेली नाही. या वेळी प्रथमच असा प्रकार घडला. परंतु, एकूण दायित्व किती? याचा नेमका आकडा १४ एप्रिलला सायंकाळी पाचपर्यंत संकलित झालेला नव्हता.
फुगीर अंदाजपत्रकामुळेच दायित्वात वाढ
केवळखर्च करण्याची सोय करण्यासाठी खर्चाच्या बाजूत वाढ सुचवली जाते. खर्चाची बाजू वाढल्यानंतर आपसूकच उत्पन्नही वाढवावे लागते. त्यामुळे उत्पन्नाचे आकडे विनाकारण फुगवले जातात. खर्चाची तरतूद केली असल्याने आपल्या सोयीने खर्च केला जातो. यामुळेच महानगरपालिकेच्या दायित्वात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
उत्पन्नाच्या ६१ टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांना
महानगरपालिकेचउत्पन्न १२९ कोटी ९६ लाख आहे. यामधून मनपा कर्मचाऱ्यांना ७४ कोटी ५३ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. उत्पन्न अंदाजे आहे. यामधून मात्र, कर्मचाऱ्यांच्या देणीची रक्कम अंदाजे नाही. एकूण उत्पन्नाच्या ६१ टक्के हिस्सा हा कर्मचाऱ्यांवरच खर्च करावा लागेल.