आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation News In Marathi, Retired Army Officer, Divya Marathi

सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍यांकडून महापालिका सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍यांमार्फत शनिवार, 12 एप्रिलला महापालिकेत कार्यरत सुरक्षा रक्षकांना नागरी सेवा सुरक्षिततेसंबंधी धडे, सेवाकार्यात अनुशासन, आत्मविश्वास, एकाग्रता व शारीरिक सुदृढता आदींबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.नागपूर येथील एक्स सर्व्हिसमॅन मल्टिपर्पज सर्व्हिसेस या कंपनीच्या वतीने देशभरातील इंडस्ट्रियल तसेच विविध क्षेत्रातील सुरक्षेबाबत सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण व सेवा देण्यात येते. मनपा सुरक्षा रक्षकांना सुरक्षेचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन देवेश्वर यांच्याशी महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी चर्चा केली होती, त्यानुसार नितीन देवेश्वर यांनी सुरक्षा प्रशिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली.

मनपा सुरक्षा रक्षकांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत असून, प्रथमच लष्करी अधिकार्‍यांकडून प्रशिक्षण मिळत आहे. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, प्रशिक्षक केंद्राचे संचालक कर्नल बी. एन. गुरुंग, लेफ्टनंट व्ही. एन. सिंग, फायर प्रशिक्षक प्रफुल्ल मुधोळकर यांनी मनपा सुरक्षा रक्षकांना सुरक्षितता, आगीपासून संरक्षण, नागरी सेवा सुरक्षेमध्ये मोर्चे, विविध मोहीम राबवताना येणार्‍या अडचणी, सुरक्षिततेबद्दल घ्यावयाची काळजी, सुरक्षा रक्षकाचे कर्तव्य, अचानक उद्भवलेली परिस्थिती योग्यरीत्या हाताळणे याबाबत विस्तृतपणे मार्गदश्रन केले. या वेळी ग्राउंड परेड प्रशिक्षण देण्यात आले. नागरी सेवा सुरक्षेमध्ये कार्यरत असताना सुरक्षा रक्षकाने पाळायचे नियम, प्रबळ आत्मविश्वास, एकाग्रता, सुदृढ राहण्यासाठी आवश्यक कसरतींबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास मनपा सुरक्षा अधिकारी मुलसिंग चव्हाण यांच्यासह सिद्धार्थ गवई, सिद्धार्थ शिरसाट, रूपेश इंगळे, विनोद वानखडे, नवीन रणपिसे, विलास पवार, अजय विटे, प्रेमशंकर मिश्रा, सतीश ठाकूर, रामेश्वर खडसे, विजय अंभोरे, सुभाष राजपूत, शैलेंद्र गोपनारायण, सुभान जट्टावाले, श्रावण वाहणे, मिलिंद इंगळे, बाली इंगळे, लता चोरपगार, सुनीता वारघडे, शोभा पांडे आदींसह सुरक्षा रक्षकांची उपस्थिती होती.