आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation News In Marathi, Teacher Salary, Divya Marathi

मनपात सव्वातीनशे शिक्षकांना सात महिन्यांच्या वेतनाची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गेल्या सात महिन्यांपासून महापालिकेतील 319 शिक्षकांचे वेतन झाले नाही. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने शिक्षकांच्या वेतनासाठी 50 टक्के निधी देऊनही महापालिकेचा हिस्सा मात्र जमा होत नसल्याने शिक्षकांचे वेतन थांबले आहे. या महत्त्वपूर्ण समस्येकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. महापालिका शिक्षकांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असून, याकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देण्याची मागणी शिक्षक संघटना करत आहे.


महापालिका 319 शिक्षकांचे वेतन व सुमारे 450 पेन्शनधारक शिक्षकांचे निवृत्तिवेतन थकित आहे. यासाठी महापालिकेला साडेपाच कोटी रुपये द्यावे लागणार असून, पण महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने शिक्षकांचे वेतन व पेन्शनधारकांचे निवृत्तिवेतन अद्याप थकित आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार पगाराच्या फरकाची रक्कम, अपदान व अंशराशी रोखीकरण, आदी पैसे घेणे आहे. पेन्शनधारकांचे नोव्हेंबर 2013 पासून निवृत्तिवेतन अद्याप देणे बाकी आहे. महापालिका कधी पैसे देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शिक्षकांचा काय दोष?
महापालिकेला राज्य शासन 50 टक्के निधी देते. पण, महापालिका स्वत:चा हिस्सा टाकू शकत नाही. त्यामुळे मोठी अडचण आहे. गेल्या सात महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन नसल्याने मोठी अडचण सहन करावी लागत आहे. शाळा, कॉलेज प्रवेश, आजारपण यांसाठी पैसा लागतो. प्रशासनाने वेतन केल्यास आमच्या समस्या सुटतील. अतिरिक्त शिक्षक असताना शिक्षणसेवक घेतले कशाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे, याचा शोध घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. चंद्रकांत देशपांडे, कार्याध्यक्ष, शिक्षक सेना.


निधीची मागणी केली
महापालिका प्रशासनाला निधीची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने निधी दिल्यानंतर तत्काळ शिक्षक व निवृत्तिवेतनधारक शिक्षकांचे वेतन करण्यात येईल. अनिल बिडवे, शिक्षण विभागप्रमुख, मनपा.