आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला पूर्व मतदारसंघात २५ वर्षे काँग्रेस माघारली; भािरपला बळकटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोलापूर्व विधानसभा मतदारसंघ बोरगाव मंजू म्हणून ओळखला जात असताना त्यावर काँग्रेस पक्षाचे अधिराज्य होते. १९८५ साली वसंतराव धोत्रे यांच्यानंतर या मतदारसंघाने काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भारिपचा वारू रोखण्यात काँग्रेसने यश मिळवले असले तरी भारिपने मात्र या मतदारसंघात चांगली पायरोवणी केली आहे. काँग्रेसच नव्हे तर विरोधकांच्या नाकात दम आणला आहे. २५ वर्षंपासून काँग्रेसला यशाची अपेक्षा आहे.
१९९० च्या निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात चंचुप्रवेश केला.

गजानन दाळू गुरुजी यांनी या निवडणुकीत िवजय प्राप्त केला. १९९५ साली गुलाबराव गावंडे यांनी सेनेसाठी ही जागा राखली. त्यानंतर १९९९ च्या िनवडणुकीमध्ये काँग्रेसने भारिपसोबत युती केली. डॉ. दशरथ भांडे विजयी झाले. भारिपकडून ते लढले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्येच सामील झाले, परंतु यामुळे काँग्रेससोबत असणारा मोठा समाज भारिपसोबत गेला. त्याचे परिणाम नंतरच्या निवडणुकीतून दिसून आले. काँग्रेसी पंजाचा आधार घेऊन भारिपने आपली ताकद अधिक मजबूत करून घेण्यात यश मिळवले.
काँग्रेसची परंपरागत व्होट बँक भारिपने काबीज केली. हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनाचाही लाभ त्यांना झाला. २००४ च्या निवडणुकीत भारिपचे हरिदास भदे, शिवसेनेचे श्रीरंग पिंजरकर, काँग्रेसचे विजय मते पाटील, अपक्ष म्हणून विजय मालोकार रिंगणात होते. भदे विजयी झाले.

२००९ च्या निवडणुकीत भदे, गुलाबराव गावंडे, विजय मालोकार यांच्यात लढत होऊन पुन्हा हरिदास भदे निवडून आले. या वेळीही त्यांनाच उमेदवारी मिळणार, असे निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून गुलाबराव गावंडे, अॅड. अनिल काळे, चंद्रकांत पांडे गुरुजी यांची नावे चर्चेत आहेत. या निवडणुकीत विजय मालोकार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. विजयभाऊ कोणती चाल खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या ते मुंबईत बसून राजकीय दिशा ठरवत आहेत.
या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकीमध्ये आपल्याभोवती राजकारण फिरत असल्याचा मुद्दा ते उपस्थित करत आहेत. मालोकार या वेळी कशी पावले टाकतात त्याकडेही जाणकारांचे लक्ष आहे.