आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडीत वॉर्ड पद्धत बंद करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-मनपात 748 कर्मचारी साफसफाईसाठी कामावर आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी पडीत वॉर्ड ही पद्धत राज्यात कुठेच नसल्याने ती बंद करा, अशी मागणी आता होत येत आहे. पडीत वॉर्डांमध्ये साफसफाईसाठी शहरातील इतर ठिकाणी कार्यरत कर्मचारी या प्रभागात समान पद्धतीने देण्याची गरज आहे. साफसफाईसाठी पडीत वॉर्ड ही पद्धत बंद केल्यास महिन्याला 20 ते 21 लाखांची बचत करणे मनपाला शक्य होईल.
दरम्यान काही नगरसेवकांनी अशी मागणी आयुक्तांकडे केली. पडीत वॉर्डात किती कर्मचारी काम करतात, याची पाहणी करण्याची गरज आहे. मनपा पडीत वॉर्डात कर्मचारी काम करत नसतील, तर ही पद्धत बंद करत कर्तव्यावरील स्थायी कर्मचार्‍यांची विभागणी करावी. त्यांची प्रभागात समान पद्धतीने विभागणी करत साफसफाई मोहीम राबवण्याची गरज आहे.
आरोग्य निरीक्षक कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या करत त्यांच्या अखत्यारीतील कर्मचार्‍यांची पाहणी व मोजणीची गरज आहे. आरोग्य निरीक्षक असलेल्या सफाई कामगारांकडून काम करण्यास सक्षम नसल्यास त्यांची इतर विभागात बदली करण्याची गरज आहे.
आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या करा
ओळखपत्रांची गरज : मनपा कर्मचार्‍यांना ओळखपत्र देण्यात येत आहे. सफाई कामगारांची हजेरी घेत त्यांनादेखील ओळखपत्राची गरज आहे. असे केल्यास मनपाचे नेमके किती कर्मचारी कामावर येतात, याचा ताळमेळ लागेल.