आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपा कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळले, वसुली वगळता सर्व कामकाज ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मनपा कर्मचार्‍यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन आता चिघळले आहे. बुधवारी तिसर्‍या दिवशीही आंदोलन सुरूच असल्याने वसुलीवगळता मनपाचे सर्व कामकाज ठप्प झाले होते. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. प्रभारी आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावर सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची गुरुवारी सकाळी दहा वाजता बैठक होणार असून, त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

सफाई कामगार, कार्यालयीन कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू नाही. मनपा कर्मचार्‍यांना पगार व निवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन नाही. यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी आज कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. कर्मचार्‍यांच्या मागण्या योग्य असून, त्या पूर्ण करण्याच्या त्या दृष्टिकोनातून सकारात्मक प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ. गुटे यांनी सांगितले. कर्मचारी संघटनांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. यावर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उद्या सकाळी बैठक घेण्याचे ठरवले. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. गुरुवारी होणार्‍या सभेत कर्मचार्‍यांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलकांनी प्रवेशद्वार बंद करून ठिय्या दिला. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी द्वारसभा घेऊन मार्गदर्शन केले. आहे. या आंदोलनात सेवानिवृत्त व कार्यरत चार हजार कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला आहे.


पदाधिकार्‍यांच्या बैठकीत कर्मचार्‍यांच्या आंदोलनाची पुढील भूमिका ठरवणार आहे. सभेला कर्मचार्‍यांचा विरोध नाही. त्यात सकारात्मक निर्णय व्हावा.’’ विठ्ठल देवकते, सरचिटणीस, कर्मचारी संघर्ष समिती, अकोला.

प्रयत्न सुरू
मनपा कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून निधी प्राप्त होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे.’’ रफिक सिद्दिकी, उपमहापौर, मनपा.

सभेत सकारात्मक निर्णय व्हावा

प्रशासन सकारात्मक
सहावा वेतन आयोगासाठी प्रशासन सकारात्मक आहे. ‘पाचव्या’च्या थकित रकमेसाठी प्रस्ताव दिला आहे. संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा झाली असून, त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.’’ डॉ. उत्कर्ष गुटे, प्रभारी आयुक्त, मनपा, अकोला.

पदाधिकार्‍यांची बैठक : मनपा कर्मचार्‍यांच्या आंदोलनासंदर्भात गुरुवारी महापौर, उपमहापौर, गटनेते व प्रभारी आयुक्तांची बैठक होणार आहे. त्यात कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय होतील.

सभेला विरोध नाही : कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा फटका मनपाच्या सभेला बसणार नाही. या सभेत कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर चर्चा होणार असून, सभा थांबवण्याचे अधिकार कर्मचार्‍यांना नाही, अशी भूमिका आंदोलक कर्मचारी संघटनांनी घेतली आहे.