आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदय विद्यालयातील "त्या' आरोपींना आश्रय देणाऱ्यास दिला जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जवाहर नवोदय विद्यालयातील ४९ मुलींच्या विनयभंगप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या चौथ्या आरोपीस न्यायालयाने आज वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
आरोपी राजन गजभिये आणि शैलेश रामटेके या दोघांना आश्रय दिल्यामुळे त्याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती, तर आरोपी गजभिये आणि रामटेके यांची दिल्ली येथे शनिवारी प्राचार्यपदाची परीक्षा असल्यामुळे त्यांना पोलिस बंदोबस्तात दिल्लीला रवाना केले आहे.
राजन गजभिये, शैलेश रामटेके, संदीप लाडखेडकर यांच्यावर मुलींच्या विनयभंगाचे आरोप झाल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली होती. संदीप लाडखेडकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान एप्रिल रोजी न्यायालयाने त्याला कारागृहात पाठवले होते, तर १० एप्रिलपर्यंत रामटेके आणि गजभिये यांना पोलिस कोठडी सुनावली होती. या दोघांचीही प्राचार्यपदाची परीक्षा दिल्ली येथे असल्यामुळे पोलिस कोठडी संपण्यापूर्वीच त्यांनी एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने त्या दोघांनाही पोलिस बंदोबस्तात दिल्ली येथे परीक्षेला घेऊन जाण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार, गुरुवारी रात्री पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पोलिस या दोघांनाही शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र एक्स्प्रेसने पोलिस बंदोबस्तात घेऊन गेले. त्यामुळे या दोघांनाही आता दिल्लीहून परीक्षा देऊन परतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, तर आरोपी गजभिये आणि रामटेके यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना नागपूर येथील मंगेश मुंगनकर याने आश्रय दिला आणि पळून जाण्यास मदत केल्यामुळे त्याला या प्रकरणात आरोपी बनवले होते. त्याची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. संजय उपर्वट यांनी काम पाहिले.