आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - इयत्ता दहावीची परीक्षा सोमवार 3 मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हय़ातून 32 हजार 405 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 128 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेत गैरप्रकार करणार्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असून, कॉपी करणारे विद्यार्थी, कॉपी पुरवणारे शिक्षक व पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
इयत्ता दहावीच्या परीक्षेची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. जिल्हय़ातून दहावीच्या परीक्षेला नियमित 26 हजार 590 विद्यार्थी, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी 5 हजार 815 राहणार आहेत. यासाठी 11 परिरक्षण केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामधून प्रश्नपत्रिकांची आणि उत्तरपत्रिकांची देखरेख होणार आहे. तसेच सर्वच पेपरचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षणाधिकार्यांच्या अखत्यारीत सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे, विशेष महिला भरारी पथकांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी व शिक्षण मंडळ सदस्यांचे स्वतंत्र भरारी पथक असेल. त्याचबरोबर कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठेपथक व इतर आवश्यक यंत्रणा असणार आहे.
दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचा प्रयत्न
इयत्ता दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचा प्रयत्न आहे. परीक्षेपूर्वी गणित, इंग्रजी आणि मराठी विषयांची सराव परीक्षा घेतली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी त्यांना समजावून सांगितल्या. बारावीच्या परीक्षा ज्याप्रमाणे कॉपीमुक्त वातावरणात होत आहेत. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षासुद्धा चांगल्या वातावरणात होईल. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज आहे. अशोक सोनोने, माध्यमिक शिक्षणाधिकारी, अकोला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.