आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Akola Municipal Corporation Commissioner

मनपा उपायुक्त गुल्हाणेंची चौकशी का करू नये?,राज्य शासनाकडून विचारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - औसा नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व येथील मनपाचे उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणेंची विभागीय चौकशी का करु नये, अशी विचारणा शासनाने केली आहे. औसा येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना सहा प्रकरणात अनियमितता करून गैरवर्तन केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे, असे नगर विकास विभागाचे मत आहे. नागरी सेवा तरतुदींचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे, असे मत व्यक्त केले आहे. याविषयी शासनाने दहा दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश त्यांना दिले आहे.


उपायुक्त गुल्हाणेंवरील दोषारोप
चंद्रशेखर गुल्हाणे यांनी 9 मार्च ते 15 एप्रिल 2011 या कालावधीत वैद्यकीय रजा घेतली. ती मंजूर नसताना त्यांनी अधिकाराचा गैरवापर करत स्वत:च्या स्वाक्षरीने या कालावधीचे वेतन कंडिशनल अँप्रुव्हल म्हणून काढले. या प्रकरणात लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना नोटीस बजावूनदेखील त्यांनी खुलासा केला नाही. नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीनुसार गुल्हाणेंची विक्षिप्त वर्तणूक असून, कर्मचार्‍यांची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते कर्मचार्‍यांना शिवीगाळ करतात व ते वादग्रस्त असून, कार्यालयात गैरहजर असतात, अशी तक्रार केली आहे. या प्रकरणात उपविभागीय अधिकार्‍यांच्या चौकशीत अनेक बाबींचा खुलासा झाला आहे.


तसेच त्यांनी 6 सप्टेंबर 2011 ते 25 मार्च 2012 या कालावधीची वैद्यकीय रजा उपभोगली आहे. ही बाब नियमबाहय़ आहे. लातूर पाटबंधारे विभागाच्या शासकीय विर्शामगृहाचा वापर करत त्याचे भाडे पाटबंधारे विभागास प्रदान केले नाही. दरम्यान सुनील सुरेश देशपांडे यांनी गुल्हाणे यांना पिस्तूल दाखवून बिलावर सही कर म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली. इतरही प्रकरणात गुल्हाणे यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. उपविभागीय अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत तथ्य आढळले. मुख्याधिकार्‍यांच्या वर्तणुकीत सुधारणा होणे आवश्यक आहे, असे त्यात स्पष्ट केले होते.