आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Assistant Register, Divya Marathi, Cooperative Milk Institute

दहा हजाराच्या लाचप्रकरणी सहायक निबंधकाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मच्छीमार सहकारी संस्थेच्या प्रस्तावाची सीडी तयार करायची आहे. त्यासाठी मुंबईला प्रस्ताव पाठवण्याच्या उद्देशाने येथील सहकारी दुग्ध संस्थेचे सहायक निबंधक गणेश अशोकराव औटी यास त्याच्या एजंटमार्फत 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता सहायक निबंधक कार्यालयात सापळा रचून केली.
बार्शिटाकळी तालुक्यातील परांड्यातीला सै. आलम सै. अल्लाउद्दीन यांना त्यांच्या प्रस्तावाची सीडी आणि बँक खाते उघडण्यासाठी गणेश औटी यांनी लाच मागितली होती. त्यानंतर गणेश औटी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 13 मार्चला त्यांनी तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या आधारे अधिकार्‍यांनी गणेश औटी यांच्या कार्यालयात सापळा रचला. या वेळी गणेश औटी यांनी तक्रारदारास लाच मागितली. पंचासमक्ष र्शीधर गुलाबराव मोडक यांच्यामार्फत लाच स्वीकारली असता पोलिस अधिकार्‍यांनी गणेश औटी आणि र्शीधर मोडक यांना अटक केली.