आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Banking Affairs, Divya Marathi

दहा लाखांवरील बँक व्यवहारांवर राहणार नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - लोकसभा निवडणूक काळात दहा लाखांवरील बँक व्यवहारांवर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामधील बँकांच्या प्रशासनाने अशा व्यवहाराची माहिती प्रशासनाला देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले आहेत.


आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. आयोगाच्या निर्देशानुसार बँकिंग व्यवहारांवरही निवडणूक आयोग करडी नजर ठेवत आहे. जिल्हा निवडणूक विभागानेयाबाबतचे आदेशही बँकांना दिले आहेत.


काय म्हणतो नियम?
आरटीईजीद्वारे एका बँक खात्यातून दुसर्‍या खात्यात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम वळती झाल्यास, त्याची माहिती सर्व राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना नियमित अथवा व्यवहार झाल्याबरोबर तत्काळ निवडणूक विभागाच्या खर्च विभागाला द्यावी लागणार आहे.
उमेदवार वा त्याची पत्नी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या खात्यातून एक लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च झाली किंवा जमा झाल्यास त्याचीही माहिती द्यावी लागणार आहे.


‘एटीएम’वरही वॉच
निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांकडून कोणत्याही वेळी तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममध्ये रोकड भरणार्‍या कॅशव्हॅन आणि सोबत असलेल्या कर्मचार्‍याची माहिती बँकांना कॅशव्हॅनमध्येच ठेवावी लागेल तसेच एटीएममध्ये भरण्यात येणार्‍या रकमेची माहितीही सोबत ठेवावी लागेल.


आर्थिक गैरव्यवहारांवर लक्ष
निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराला स्वतंत्र खाते उघडण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सोबतच निवडणूक काळात आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी दहा लाख रुपयांवरील व्यवहाराची माहिती निवडणूक विभागाला कळवण्याबाबत बँकांना सूचित केले आहे. ’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी, अकोला.