आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, BJP, Congress, Divya Marathi, Lok Sabha Election

भाऊ, सीट निघाली ना.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते अगदी जोरात स्वपक्षाचा उमेदवार विजयी कसा होणार, याचा प्रचार करत आहे. भाजप, भारिप व काँग्रेस या तीन पक्षांचे नेते स्वपक्षाचा उमेदवारच विजयी होत असल्याचा दावा करत आहे. यासाठी त्यांचे गणित निश्चित आहे. जातीय समीकरण ते अगदी तोंडपाठ करत धडधड सांगतात. ज्या व्यक्तीला कार्यकर्तेही आकडेवारी सांगतात त्याला अकोल्यातून तीन उमेदवार विजयी होतात काय, असा प्रश्न पडतो.
लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यापासून कोण जिंकते याचे विवेचन प्रत्येकजण करताना दिसतो. किती मतदान झाले यापासून त्याची सुरुवात होते. किती टक्केवारी कुणाला मिळेल, विधानसभेत इतके मिळाले होते, आता भाऊंना इतके मते मिळतील, अशी चर्चा रंगत आहे.


अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यात लढत आहे. ही लढत निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याने अधिक रंगतदार झाली. वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडली, युवकांनी कुणाला मतदान केले, भाऊंसाठी कोणी काम केले आणि कुणी विरोधात काम केले याची जंत्री कार्यकर्त्यांजवळ असते. त्याआधारे कोण जिंकते याचा दावा करण्यात स्वपक्षीय कार्यकर्ते अगदी व्यस्त आहेत. शासकीय कार्यालयात, चहाच्या टपरीवर ही चर्चा रंगताना दिसत आहे. युवकाच्या कट्टय़ावरदेखील हाच विषय कायम आहे. राजकीय नेत्यांमध्येदेखील याची जोरदार चर्चा असून, कुणी कुणाचे काम केले. त्याचा कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल याची इंत्थभूत माहितीची आकडेवारी मांडण्यात येते. राजकीय नेत्यांद्वारेदेखील तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत असून, त्यापैकी कोण विजयी होईल याचे प्रत्येकाचे स्वतंत्र मुद्दे आहेत. या मुद्दय़ांच्या आधारे प्रत्येक उमेदवारच विजयी झाल्याचे चित्र निर्माण होत आहे. सर्वच उमेदवार विजयी होणार नाही त्यापैकी एकजण विजयी होईल. मतमोजणीच्या दिवसापर्यंत या चर्चांना अधिक उधाण येणार आहे.