आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर तपासणीसंदर्भातील असहकार आंदोलन मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दहावी आणि बारावी पेपर तपासणीसाठी आलेले गठ्ठे मुख्याध्यापक स्वीकारणार नाहीत, असा इशारा मुख्याध्यापक संघटनेने शासनाला दिला होता. मुख्याध्यापकांचे हे बेमुदत असहकार आंदोलन आज शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनाने मागे घेण्यात आले आहे.


दहावी व बारावीचे पेपर तपासणीसाठी मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात येतात. पेपरचे हे गठ्ठे संबंधित शिक्षकांपर्यंत पाठवण्याची आणि तपासून झालेले पेपर बोर्डाकडे परत करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे असते. असहकार आंदोलनात उतरलेले मुख्याध्यापक तपासणीसाठी आलेले पेपरचे गठ्ठेच स्वीकारणार नाहीत, असा पवित्रा मुख्याध्यापकांच्या संघटनेने घेतला होता. त्यामुळे बारावीचे पेपर स्वीकारण्यास मुख्याध्यापकांनी स्पष्ट नकार दिला होता. मंगळवारी शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर हे असहकार आंदोलन मागे घेतले आहे. 20 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. पेपरचे गठ्ठे अनेक ठिकाणी टपाल कार्यालयात पडून होते. वेतनातील तफावत दूर करणे, ग्रेड-पे चा प्रश्न निकाली काढणे, या प्रमुख मागण्यांसाठी मुख्याध्यापकांनी असहकार आंदोलनाचा निर्णय घेतला होता. या आंदोलनात विभागातील 2400 मुख्याध्यापकांसह राज्यातील 22 हजार मुख्याध्यापक सहभागी झाले होते.


आजपासून मुख्याध्यापक पेपर स्वीकारतील
शिक्षण मंत्र्यांनी आमच्या प्रलंबित मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमचे असहकार आंदोलन आम्ही मागे घेतले आहे. आजपासून आम्ही पेपरचे गठ्ठे स्वीकारणार आहोत. शत्रुघ्न बिरकड, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ