आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Central Railway, Divya Marathi

मध्य रेल्वेची वाहतूक अखेर पूर्वपदावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मलकापूर बोदवड दरम्यान रविवारी सकाळी 10.30 वाजता भुवनेश्वर येथून भोईसर येथे लोखंडी पत्रे घेऊन जाणार्‍या मालगाडीला अपघात झाल्याने अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात रविवारी बदल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली.


मंगळवारी नागपूरकडे जाणार्‍या गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केली. रविवारी भुसावळ-नागपूर आणि अमरावती-भुसावळ पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली. हावडा-मुंबई गीताजंली एक्स्प्रेस वगळता सर्वच रेल्वेगाड्या वेळेवर धावल्या. मंगळवारी मात्र नागपूरकडून मुंबईकडे जाणार्‍या गाड्या वेळेवर धावतील, तर मुंबईहून नागपूरकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या दोन ते तीन तासांनी उशिरा धावण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.