आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Congress, Narayan Gavankar, Divya Marathi

काँग्रेस उमेदवार म्हणून अर्ज भरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘आपण काँग्रेस उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मंगळवार, 18 मार्च रोजी स्वराज्य भवनातून काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करू, अशी माहिती काँग्रेस नेते नारायण गव्हाणकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लोकसभा मतदारसंघाबाबत विचार करू, असे आश्वासन दिल्याचे सांगितले. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. हे आश्वासन देतेवेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर, नातिकोद्दीन खतीब, सुधाकर गणगणे आदींची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत दिलेल्या आश्वासनानंतरदेखील पक्षाने जिल्हाध्यक्ष हिदायत पटेलांची उमेदवारी घोषित केली. त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाही, कुठलेही मतभेद नाही. पण, काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळावे, असे ते म्हणाले. काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 26 मार्चपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत इतर मतदारसंघात मुस्लीम उमेदवार देत येथे बदलाचे संकेत पक्षाने दिले आहे,असे ते म्हणाले.


मॅच फिक्सिंगवर मौन : यावेळी गव्हाणकरांनी मॅच फिक्सिंग झाल्याचे सांगितले. पण, मॅच फिक्सिंग कोणात झाली, असे विचारल्यावरदेखील त्यांनी सांगितले नाही. मांग के ना मिले रोटी.. ना मांगे मिले मोती.. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.


हिदायत पटेल आमचे उमेदवार
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिदायत पटेल हे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. आज तरी हिदायत पटेल हेच आमचे उमेदवार आहेत. नारायण गव्हाणकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, याची माहिती घेऊ व त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देता येईल.’’ अरुण मुगदिया, पक्ष निरीक्षक, काँग्रेस.


मी निवडणूक लढणार आहे
पक्षाने आदेश दिला आहे. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे. काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशानुसारच काम करावे लागेल. पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. गव्हाणकर यांचे ते वैयक्तिक मत आहे. त्यावर प्रतिक्रिया काय देणार.’’ हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.