आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Divya Marathi, District Veternary Hospital

लाळ खुरकूत लस वाटप करून वरिष्ठ अधिकार्‍यांची सारवासारव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘जिल्हा पशू सर्व चिकित्सालयामधील डीप फ्रीजर बंद पडल्याने लाखोंच्या लसींचे नुकसान’, असे वृत्त दैनिक दिव्य मराठीत प्रकाशित होताच अधिकार्‍यांनी सारवासारव करत मंगळवार, 15 एप्रिलला बाळापूर,बार्शिटाकळी तालुक्यातील पशुवैद्यकांसह पॉलिक्लिनिकमध्ये एक लाख डोजेस लसीचे वितरण केले. आवश्यक तापमान (कोल्ड चेन मेन्टेन) न झालेल्या लसीचेच वितरण केल्याने ही लस कितपत जनावरांच्या उपयोगी पडेल, हा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
पशुचिकित्सालयामध्ये लाळ्या व खुरकूत आजारांची लस प्राप्त झाली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही लस प्राप्त होऊनसुद्धा पशुवैद्यकांना त्याचे वितरण केले नव्हते. पशुचिकित्सालयातील डीप फ्रीजर बंदमुळे कोल्ड चेन मेन्टेन झालेली नाही. त्यामुळे लसीचा प्रभाव कमी झालेला आहे.


लसीमधील दर्जाची तपासणी न करताच याच लसीचे वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा पशू सर्व चिकित्सालयातील हा प्रकार लपवण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अशोक हजारे, पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहायक आयुक्त पी. एन. राठोड यांनी याची माहिती अमरावती पशुसंवर्धन विभागाच्या विभागीय सहआयुक्त कार्यालयाला न देता लस वितरित करण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


जनावरांच्या आरोग्याशी खेळ : सात ते आठ दिवस कोल्ड चेन मेन्टेन न झाल्याने खराब झालेल्या या लसींची तपासणी न करता पशुवैद्यकांना वाटप केली. त्यामुळे ही लस किती प्रमाणात जनावरांच्या आजारांवर परिणामकारक करेल, हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अधिकार्‍यांनी चूक लपवण्यासाठी हा प्रकार केल्याचे उघड होत आहे.