आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Divya Marathi, Vinayak Pande, Fool Literature Festivel

अकोला शहरामध्ये रंगपंचमीला रंगणार 42 वे मूर्खसंमेलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दीर्घ परंपरा लाभलेल्या अकोल्यातील मूर्खसंमेलनाचे यंदा 42 वे वर्ष आहे. स्वराज्य भवनाच्या प्रांगणात धूलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता हे संमेलन रंगणार आहे. यंदाच्या संमेलनात शाहीर वसंत मानवटकर ‘70 साल की कुंआरी’ या विनोदी कार्यक्रमातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतील. महादेवराव भुईभार ‘वासुदेव आला रे’, विनायक पांडे ‘योगिराज की नेतागिरी’, शिवहरी माळी ‘आपून सारे भाऊ, इंडिया वाटून खाऊ’ सादर करतील. सावनकुमार मस्ताना हास्यव्यंग, ह. मो. खटोड गुरुजी, एस. डी. सदांशिव जादूचे प्रयोग, शिवलाल माझोडकर स्त्रीभ्रूण हत्या, शाहीर प्रभाकर देशमुख ‘संस्कृती डुबाई’, रमेश थोरात व स्वप्निल खेडकर ‘पोरगा जिद्दी, बाप रद्दी’, भरत वरोटे कॅब्रे डान्स, धीरज डोंगरे हिप-हॉप मस्ती सादर करतील.
वर्‍हाडी कवी अरविंद भोंडे, विशाल वाघमारे व पूनम मेश्राम नृत्य, संस्कार परिवारचा कचरा आर्केस्ट्रा, ज्योती विद्यालयाचे समूहनृत्य, अंध विद्यालयाचा ऑर्केस्ट्रा, डब्बू शर्मांची गर्दभ वंदना, सावित्रीबाई विद्यालयाची वाघ्या मुरळी सादर होईल. अरुण ढोणे मराठी विनोद, पीयूष इंगळे लावणी नृत्य सादर करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामप्रकाश वर्मा करतील. या संमेलनासाठी सर्वेशचंद्र कटियार, राजेंद्रकिशोर र्शीवास, योगेश इंगळे, अनुराग मिर्श, महादेव हुरपडे, नीरज शाह, विश्वंभर ताकवाले, पांडुरंग कवडे, अनिक अहमद, सिद्धार्थ शर्मा, शौकतअली मीर, रवी मिश्रा आदी पुढाकार घेत आहे. या संमेलनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विकासचंद्र शर्मा, रामकिशोर र्शीवास यांनी केले आहे.