आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Hailstorm, Agriculture Assistance, Divya Marathi

जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना कृषी सहायकांचा मदतीचा हात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पाऊस व गारपीटग्रस्त भागाचे सर्वेक्षण करताना या भागातील विदारक स्थिती पाहून कृषी सहायकांनी एक दिवसाचे वेतन मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे सरचिटणीस विक्रांत परमार यांनी बुधवारी दिली. राज्यभरातील कृषी सहायकांच्या एक दिवसाच्या वेतनाची ही रक्कम एक कोटी 10 लाख रुपयांच्या जवळपास आहे.


मागील 10 ते 15 दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान मोठे असल्याची बाब पंचनामे करताना कृषी सहायकांच्या निदर्शनास आली. या परिस्थितीत शेतकर्‍यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे सर्व राज्य पदाधिकारी, विभागीय सचिव तसेच जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सभासद, संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आनंद कोठाडिया यांनी विचारविनिमय केला. आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात म्हणून संघटनेच्या राज्यभरातील सर्व कृषी सहायक आणि कृषी सेवक सदस्यांचे एक दिवसाचे वेतन शासनाच्या मदत निधीमध्ये देण्याचा निर्णय संघटनेने सर्वानुमते घेतला आहे.