आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Hailstorm, Unseasonal Rain, Divya Marathi

आणखी दोन दिवस होऊ शकते गारपीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हय़ात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात गारपीट होत आहे. अनेक दिवसांपासून झालेली ही परिस्थिती कायम राहणार असून, अजून दोन दिवस जिल्हय़ात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरापासून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत, तर उत्तरेकडून थंड वारे येत आहे. दोन्हीकडून येणार्‍या या वार्‍यांमुळे एका विशिष्ट पातळीवर गोठण्याची प्रक्रिया लवकर होत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर गारपीट होत आहे. जिल्हय़ात ही परिस्थिती अजून दोन दिवस कायम राहणार असली तरी प्रमाण कमी होणार आहे. ऊन, तुरळक पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट असे मिर्श वातावरण राहणार आहे.


विदर्भात सर्वत्र हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. बुलडाणा ते अमरावती या पट्टय़ात पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा, चंद्रपूर या भागातदेखील गारपीट होण्याची शक्यता आहे. जिल्हय़ात काही ठिकाणी तुरळक पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असणार आहे.


पिकांचे नुकसान
मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस व गारपीटमुळे जवळपास 14 ते 15 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हय़ात अनेक ठिकाणी गहू व हरभरा, भाजीपाला याचे नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणी तेथे झालेल्या गारपीटनुसार कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटमुळे काही ठिकाणी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट, पावसाचा जोर कमी झाला नाही. काही ठिकाणी गारपीट होत असल्याने पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी दिली.