आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

शांतता व सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात कलम 36 लागू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्या दृष्टीने अकोला जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेसाठी कलम 36 लागू करण्यात आले आहे.जिल्ह्यात 10 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी संपल्यानंतर विजयी उमेदवाराची मिरवणूक निघेल. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव होणार आहे. लोकसभा निवडणूक व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात या कालावधीत शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कलम 36 अन्वये आदेश जारी केले आहेत. हा आदेश 2 एप्रिल ते 15 एप्रिल व 15 मे ते 17 मेदरम्यान लागू असणार आहे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलिस अधिनियम कलम 134 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी कळवले आहे.