आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Lok Sabha Election, Voting, Divya Marathi

प्रचारतोफा आज थंडावणार; प्रशासनाची जय्यत तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील दहा दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी धडाडणार्‍या प्रचारतोफा मंगळवारी, 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली असून, जिल्ह्यात 1,755 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 16 लाख 73 हजार 823 मतदार आहे.
जिल्ह्यातील एकूण 7 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीचे मतदान 10 एप्रिल रोजी होणार आहे. अकोला मतदारसंघातून भानुदास कांबळे (बसप), संजय धोत्रे (भाजप), हिदायत पटेल (काँंग्रेस), अजय हिंगणकर (आप), अँड. प्रकाश आंबेडकर (भारिप-बमसं), शेख हमीद इमाम (बहुजन मुक्ती पार्टी), संदीप वानखेडे (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या 10 दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. यासाठी सोशल मीडियासह प्रचारसभा, कोपरा बैठका घेण्यात आल्या. विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांनीदेखील त्यांच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचारसभा घेतल्या.
जिल्हा प्रशासन सज्ज : मतदारसंघांतील मतदारांना केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, अपंगांना साधने यासह इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे.
1,755 मतदान केंद्र : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये एकूण 145 झोन तयार केले आहेत. यामध्ये 1,755 मतदान केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्राधिकारी, पाच कर्मचारी व सुरक्षा गार्ड अशा कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यात एकूण 8,455 मतदान अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत.
अधिकार्‍यांची करडी नजर
जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, तीन निवडणूक निरीक्षक हे प्रत्येक निवडणूकविषयक हालचालीवर नजर ठेवून आहेत. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह तहसीलदार निवडणूक प्रक्रिया शांततेत होईल, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी देखील निवडणुकीच्या कामाला लागले आहे.
दृष्टिक्षेपात मतदार
मतदारसंघ महिला पुरुष एकूण
अकोट 1,42,792 1,22,904 2,65,696
बाळापूर 1,44,484 1,28,717 2,73,203
अकोला पश्चिम 1,41,499 1,29,039 2,70,544
अकोला पूर्व 1,55,171 1,40,364 2,95,543
मूर्तिजापूर 1,49,258 1,36,994 2,86,252
रिसोड 1,49,649 1,32,936 2,82,585
एकूण 8,82,853 7,90,954 16,73,823