आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Modi Gulala, Election Commission ,BJP, Divya Marathi

मोदी गुलाला’ची घेतली निवडणूक आयोगाने दखल, भाजप नेत्यांची होणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिवणी विमानतळावर शुक्रवारी ‘मोदी गुलाला’चे लाँचिंग करणारे भाजपचे नेते अडचणीत आले आहेत. ‘दिव्य मराठी’त बातमी प्रकाशित झाल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने आचारसंहितेच्या दृष्टीने या ‘लाँचिंग’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना दिले आहेत.
येथील शिवणी विमानतळावर शुक्रवारी 14 मार्च रोजी दुपारी ‘मोदी गुलाला’चे लाँचिंग करण्यात आले होते. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे का, याविषयी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
भाजपने काल शिवणी विमानतळाच्या प्रतीक्षालयात ‘मोदी गुलाला’च्या पाकिटांचे लाँचिंग केले होते. या प्रकाराने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाला काय? या दृष्टीने निवडणूक विभाग अभ्यास करत आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी दिवेकर म्हणाले की, शिवणी विमानतळ हे उपविभागीय महसूल अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने त्यांनी या प्रकाराची चौकशी करावी, तसे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. दुसरीकडे शिवणी विमानतळाचे व्यवस्थापक प्रजापती म्हणाले की, विमानतळावरील सुरक्षा पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम होत असेल, तर त्याला पोलिस जबाबदार आहेत. त्यांनी कारवाई करावी. शिवणी विमानतळावर खासदार संजय धोत्रे, आमदार भाऊसाहेब फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी ‘मोदी गुलाला’च्या पाकिटांचे लाँचिंग केले होते. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन म्हणून याकडे पाहिले जात आहे.