आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Molestation, Murder, Divya Marathi

पत्नीचा विनयभंग करणार्‍या चुलत भावाची कोयत्याने वार करून हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल्हारा - शेतात काम करणार्‍या पत्नीचा विनयभंग करणार्‍या चुलत भावाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विलास समाधान इंगळे (40) असे मृतकाचे तर राजू प्रल्हाद इंगळे हे आरोपीचे नाव आहे. बुधवार, 12 मार्चला तालुक्यातील उकळी बाजार शिवारात सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा थरार घडला. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी राजू इंगळेसह एकूण चौघांना अटक केली आहे.


विलास समाधान इंगळे (वय 40) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर उरळ, हिवरखेड, तेल्हारा पोलिस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 12 मार्चला सकाळी त्याने शेतात काम करणार्‍या भावजयीचा विनयभंग केला. या वेळी प्रतिकार करून पीडितेने त्याच्या तावडीतून सुटका केल्यावर या प्रकाराची माहिती पती राजू इंगळेला दिली. या प्रकारामुळे चिडलेल्या राजू इंगळेने प्रल्हाद मोतीराम इंगळे, रमा प्रल्हाद इंगळे, सीमा इंगळे यांना सोबत घेऊन विलास इंगळेला गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणाची माहिती पोलिस पाटील काळे यांनी तेल्हारा पोलिसांना दिली. या वेळी जखमी अवस्थेतील विलास इंगळेला ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.


शेतीच्या वादातून हत्येचा आरोप
मृतकाच्या पत्नीने पती विलास इंगळेचा राजू इंगळे व इतरांसोबत शेतीचा वाद होता, असे पोलिसांना सांगितले. त्यातूनच पतीची हत्या झाल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू प्रल्हाद इंगळे, प्रल्हाद मोतीराम इंगळे, रमा प्रल्हाद इंगळे, सीमा राजू इंगळे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मी नांदेडकर यांनी तेल्हारा येथे भेट दिली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनंत निकम करीत आहेत.