आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Paid News, Election Coverage, Divya Marathi

‘पेड न्यूज’च्या मोहात पडू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान माध्यमांनी जाहिरात किंवा बातमीच्या स्वरूपात पेड न्यूज प्रकाशित करू नये, असा सल्ला निवडणूक विभागाचे निरीक्षक आर. पी. सरोज यांनी 12 मार्चला दिला. पेड न्यूजच्या मोहात पडू नये, हा गुन्हा असल्याने माध्यमांनी याची खबरदारीचे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय माध्यम निरीक्षक समितीची बैठक 12 मार्चला आयोजित केली होती. या बैठकीत ‘पेड न्यूज’विषयी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, समिती सदस्य मिरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याप्रसंगी सुरुवातीला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले की, भारतीय प्रेस कौन्सिलच्या व्याख्येनुसार पेड न्यूज म्हणजे पैसे किंवा वस्तूच्या मोबदल्यात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून एखादी बातमी अथवा परीक्षण छापून आणणे, अशी आयोगाने सर्वसाधारणपणे ही व्याख्या स्वीकारली आहे. पेड न्यूजला गुन्हा ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू, असे कुठल्याही प्रकारचा पेड न्यूजचा प्रकार घडणार नाही याची दक्षता प्रत्येक माध्यमाने घ्यावी, अशी अपेक्षा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केली.


पेड न्यूज म्हणजे काय?
1, स्पर्धात्मक प्रकाशनामध्ये, छायाचित्रे, शीर्षक समान आढळणे.
2, विशिष्ट वृत्तपत्रांच्या पानावर, उमेदवारांची प्रशंसा करणारे आणि त्यांची निवडणूक जिंकण्याची शक्यता वर्तवणारे लेख.
3, प्रत्येक घटकाचा पाठिंबा असून, उमेदवार निवडणूक जिंकणार असल्याचे वृत्त.
4, उमेदवाराची अधिक प्रसिद्धी करणे. विरोधकांच्या बातम्या न घेणे.

‘एडीव्हीटी’वर विशेष लक्ष
निवडणूक काळामध्ये बातमीच्या तळाशी ‘एडीव्हीटी’ असे लिहून प्रकाशित केलेल्या बातमीवर विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे नियमाचा भंग होईल असे प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये. अरुण शिंदे, जिल्हाधिकारी, अकोला.