आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - जिल्हय़ात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आले आहे. उन्हाळा असला तरी अवकाळी पावसासह होणार्या गारपिटीच्या थंडाव्यात प्रशासनासह राजकीय क्षेत्राला निवडणुकीचा फीव्हर चढलेला दिसून येत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्याच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनात महसूल यंत्रणा, पोलिस प्रशासन व जिल्हा परिषदेच्या प्रशासनांतर्गत कार्यरत कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 5 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हय़ात महसूल यंत्रणेसह पोलिस, जिल्हा परिषद व अन्य विभागांचीही मदत निवडणूककामी घेतली जात आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत महसूल विभाग, जिल्हा परिषद, नगर पालिका, पोलिस प्रशासनाचा सहभाग आहे.
निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. निवडणुकीचे काम व्यवस्थित व्हावे, या दृष्टीने केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून ग्राम पातळीवरील कर्मचार्यांवर निवडणूक कामाची जबाबदारी दिलेली आहे. जिल्हाधिकारी अरुण शिंदे व पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, एसीपी निकेश खाटमोडे, निवडणूक विभागप्रमुख, उपजिल्हाधिकारी उदय राजपूत या अधिकार्यांच्या नेतृत्वात निवडणुकीचे कामकाज सुरू आहे.
पोलिस मुख्यालयात स्वतंत्र कक्ष : निवडणूक काळात प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात येत आहे. याकरिता पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विशेष शाखेत निवडणुकीकरिता स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला आहे.
मतदार यादीचे काम सुरू : रविवारी 9 मार्च रोजी राबवलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत केलेल्या मतदारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्रस्तरीय अधिकार्यांकडून ही माहिती गोळा करणे सुरू आहे. उपविभागीय महसूल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या मंजुरीनंतर ही यादी जाहीर करण्यात येईल.
याद्यांचे काम सुरू
रविवारी 9 मार्च रोजी राबवलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेची आकडेवारी संग्रहित करणे सुरू आहे. अंतिम यादी तयार केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ती यादी जाहीर करण्यात येईल. उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग प्रमुख.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.