आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भासाठी रिपाइंने काढला मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला.मागील अनेक वर्षांपासून विदर्भ राज्य झाले पाहिजे, ही विदर्भातील जनतेची प्रमुख मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे राज्यात व विदर्भातील जिल्हय़ातून आंदोलने, जेल भरो, रेल रोको, सभा, परिसंवाद, मोर्चे आदींच्या माध्यमातून रेटली आहे. परंतु, या मागणीला केंद्र व राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने अद्यापही संमती दिली नाही. त्यामुळे विदर्भवासीयांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे.

नागपूर कराराप्रमाणे पुण्यातील सहकार, शेती, पशुसंवर्धन, समाजकल्याण, क्रीडा, शिक्षण, सामाजिक वनीकरण, साखर, नगररचना, पणन अशा खात्यांच्या संचालनालयाची कार्यालये मागील 50 वर्षांत नागपूरला आणायला पाहिजे होती. परंतु, ती अद्यापपर्यंत आणली नाही. त्यामुळे विदर्भवासीयांना विकासापासून जाणूनबुजून वंचित ठेवले आहे. शैक्षणिकदृष्ट्या विदर्भात वैद्यकीय, अभियांत्रिकी, वाणिज्य, कला व विज्ञान आदीचे शैक्षणिक उपक्रम विदर्भात कमी प्रमाणात आहे. राज्य मोठे असल्याने विविध प्रदेशांच्या विशेष गरजांकडे शासन लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे छोटे राज्य प्रशासनाच्या दृष्टीने योग्य असू शकते. या बाबींचा योग्य विचार होऊन विदर्भ राज्याची मागणी रेटून धरली जात आहे.

जोपर्यंत विदर्भ वेगळे राज्य होत नाही, तोपर्यंत रिपाइंचा लढा सुरूच राहील, असे निवेदनात नमूद केले आहे. उपजिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे हे निवेदन सादर केले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डी. गोपनारायण, गजानन इंगळे, वंदना वासनिक, देवीदास वाहुरवाघ, नामदेव शिरसाट, उषाताई जंजाळ, श्रीकृष्ण वानखडे, जीवन गवई, युवराज भगत, दीपक नवघरे, जुगलकिशोर जामनिक, मोतीराम डोंगरदिवे, विजय सदांशिव, रवी ठाकूर आदींनी सहभाग घेतला.