आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Shivaji Maharaj Is A Ideal For Youth, Divya Marathi

‘शिवरायांचे प्रशासन सुराज्यासाठी महत्त्वाचे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराज आजच्या युवा पिढीचे प्रेरणास्थान आहे. त्यांचे राज्य प्रशासन आजही सुराज्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या के. आर. ठाकरे सभागृहात बुधवारी शिवजयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रा. गोसावी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी होते. या वेळी डॉ. व्ही. के. माहोरकर, डॉ. व्ही. एम. भाले, ज्ञानेश्वर भारती, पी. व्ही. तेलकुंट, प्रा. डी. बी. तामगाडगे यांची उपस्थिती होती. संचालन संजय कोकाटे यांनी केले. आभार राम मुळे यांनी मानले. शिवरायांचे विचार जलसंवर्धनासाठी आजही प्रेरक असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. दाणी यांनी ‘सिंहगड’ पाहणीचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाला विभागप्रमुख शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.