आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Teacher Eligibility Test, Examination Council, Divya Marathi

गुणांसाठी सूट, तरी अपयश; शिक्षक होण्याचे स्वप्न धूसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शिक्षक पात्रता चाचणी परीक्षे (टीईटी)च्या पहिली ते पाचवीसाठी आणि सहावी ते आठवीसाठीच्या शिक्षकांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन पेपरची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आली होती. दोनही पेपरच्या 150 प्रश्‍नांसाठी 150 गुण होते. परीक्षा परिषदेने जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी खास सूट दिली होती. शिक्षकांनी 150 पैकी 90 टक्के प्रश्‍न सोडवून त्यात त्यांना किमान 60 टक्के गुण मिळवणे अपेक्षित होते. मात्र, 94 टक्क्यांहून अधिक शिक्षक हे गुणांच्या 60 टक्के गुणही मिळवू शकले नाहीत. त्यामुळे या परीक्षेत ते शिक्षक नापास ठरले आहेत.


या निकालावरून मराठी शाळांतील शैक्षणिक दर्जाच्या वास्तवास कोण जबाबदार आहे, हे वास्तव समोर आले आहे. सेट-नेटच्या धर्तीवर यंदा प्रथमच महाराष्ट्र शिक्षक परिषदेमार्फत डीटीएड आणि बीएड उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी टीईटी परीक्षा घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रथमच राज्यात एकाच दिवशी टीईटीची परीक्षा घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांचे पीक आले होते.


कितीही टक्केवारी असली तरी डीएडला प्रवेश मिळू लागला. त्यामुळे डीएड आणि बीएडकडे मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी वळले. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता कशी टिकवायची, त्यावर राज्य सरकारने टीईटी घेण्याचे निश्चित केले आणि त्यानुसार परीक्षा घेण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणार्‍या शिक्षकांची पात्रताच नसेल तर विद्यार्थी कसे घडणार, हा प्रश्‍न समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


सुरुवातीला या परीक्षेला शिक्षक आमदारांपासून तर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता तसेच परीक्षेत विचारलेल्या प्रश्‍नांवरही आक्षेप घेण्यात आले. मात्र, परीक्षा परिषदेने त्यावर तोडगा काढून गुणांसाठी विशेष सूट दिली होती. मात्र, तरीही हे भावी शिक्षक फे ल झाले असून, गुरुजींची गुणवत्ता घसरल्याने शिक्षक होण्याचे त्यांचे स्वप्न धूसर झाले आहे.