आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola News In Marathi, Tyer, Divya Marathi, Two Wheeler

वाहनांच्या टायरला मागणी वाढली, पण मार्केट ‘जाम’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पावसाळा तोंडावर आल्याने अनेक वाहनधानक आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची निगा व देखभाल करण्याच्या तयारीस लागले आहेत. पावसाळ्यात गाड्यांचे घासलेले टायर स्लीप होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे अनेक जण गाड्यांचे टायर बदलण्यासाठी गॅरेजवाल्यांकडे धाव घेत आहेत. मात्र, मार्केटमध्ये मागणी दुपटीपेक्षाही जास्त आणि त्या तुलनेत टायरची उपलब्धता कमी, असे चित्र आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटमध्ये टायरच्या किमती कमी केल्या आहेत, असे असले तरी मात्र प्रत्यक्षात टायरच्या किमती वधारल्या आहेत. कारण ऐन सीझनमध्ये टायर निर्मात्या कंपन्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे उत्पादनाच्या तुलनेत मागणी दुपटीपेक्षाही जास्त वाढली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये टायरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा टायर विक्रेते घेत आहेत. परिणामी, टायरच्या किमती 150 ते 200 रुपयांनी महागल्या आहेत.

डनलप या कंपनीच्या टायर निर्मितीचा प्रकल्प बंद पडला. तो प्रकल्प दुसर्‍या कंपनीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन मार्केटमध्ये नाहीच. टीव्हीएस व एमआरएफ या कंपन्यांचे टायर बाजारात आहेत. मात्र, त्यांची संख्या र्मयादित आहे व किंमतही जास्तच आहे. सीएटसह इतर कंपन्यांचे टायर आहेत. मात्र, त्यांची उपलब्धता ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकेल एवढी नाही, अशी स्थिती अकोल्याची आहे. अशीच काहीशी स्थिती राज्यभरात आहे, असे येथील विविध कंपन्यांचे टायर विक्रेते राजेश आंबेकर यांनी सांगितले.
‘डनलप’ या प्रमुख टायर उत्पादक कंपन्यांचे उत्पादन बाजारात येणेच बंद झाले आहे. ‘एमआरएफ, टीव्हीएस व सीएट’ या कंपन्यांकडून मालाचा पुरवठा कमी आहे. वितरकाची मागणी 100 ची असताना 40 टायर कंपन्या पाठवत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये टायरचा तुटवडा जाणवत आहे.’’ मयूरभाई, संचालक, अकोला टायर्स.

तुटवडा दोन महिने शक्य
दरम्यान, पावसाळ्याच्या दिवसात घासलेले टायर स्लीप होऊन अपघात घडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे ते टाळण्यासाठी टायर बदलण्याची घाई बहुतांश वाहनधारक करत असतात. त्यातच कंपन्यांचे घटलेले उत्पादन आणि वाढलेली मागणी यामुळे टायरचा हा तुटवडा साधारणत: दोन ते अडीच महिने राहील, असा अंदाज प्रमुख टायर वितरकांनी व्यक्त केला आहे.