आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola News On Politics, Akola Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला मनपाची सर्वसाधारण सभा 25 फेब्रुवारीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 25 फेब्रुवारीला सकाळी 11.30 वाजता मनपा सभागृहात आयोजित केली आहे. अकोला महापालिकेची सुमारे तीन महिन्यांनंतर सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत 10 ऑक्टोबर 2013, 28 नोव्हेंबर 2013 रोजीचे इतिवृत्त कायम करणे, क्षितिज बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्थेला अकोला शहरातील घनकचरा उचलणे, वाहतूक करणे व नियोजित ठिकाणी पोहोचवण्याचा ठेका तक्रारींच्या अनुषंगाने रद्द करून घनकचरा टनानुसार उचलण्यासाठी संबंधित प्रक्रिया राबवणे, जकात रद्द केल्यामुळे महापालिकेच्या मूलभूत सुविधेसाठी 4 कोटी प्राप्त झालेली रक्कम वेतन, भत्ते व इतर थकित रक्कम देण्याकरिता चर्चा करून निर्णय घेणे, अशोक वाटिका देखभालीसाठी चर्चा करून निर्णय घेणे, रिलायन्स कंपनीच्या 4 जी केबल व टॉवर उभारणीचा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेणे, नगरसेवक यांचे मानधन वाढवणे व पेन्शन मिळण्यासाठी चर्चा करून निर्णय घेणे आदींसह एकूण 17 विषयांवर आमसभेत चर्चा होणार आहे.