आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहने उचलण्यासाठी आता लवकरच पाच टोइंग मशीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरामधील बेशिस्त पार्किंग व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी वाहतूक विभागाने टोइंग मशीन सुरू केली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंड आकारण्याचा सपाटा वाहतूक शाखेने लावला आहे. कारवाई करण्यासाठी एक वाहन अपुरे पडत असल्यामुळे आता आणखी चार वाहने वाढवण्यात येणार आहे.

पोलिस दलातील एका वाहनाचा वापर वाहने उचलणाऱ्या टोइंग मशीनसाठी केला आहे. त्यामुळे वाहने उचलण्यासाठी आणखी चार टोइंग वाहने दाखल होणार आहेत. शहरामध्ये रस्त्यावर बेशिस्तपणे दुचाकी वाहने उभी करून ठेवल्या जातात. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पूर्वी कोणतीही यंत्रणा वाहतूक पोलिसांकडे नव्हती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहन कार्यरत झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न होत आहे.
जानेवारीपर्यंतवाहने : वाहनेखरेदी करण्याची प्रक्रिया जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्यामुळे जानेवारी महिन्यानंतर पाच टोइंग मशीन सुरू होणार आहेत.

नागपूरहूनमागवले जामर : चारचाकीगाड्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने जामरचा पर्याय निवडला आहे. महिनाभरात नागपूरहून जामर येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

लाेकांमध्ये होतेय जागृती
दोनमहिन्यांपासून शहरामध्ये टोइंग मशीन कार्यरत आहे. त्याचे रिझल्ट आता दिसून येत आहेत. शहरामध्ये रस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्या वाहनावर कारवाई झाली ते वाहनधारक इतरांना कारवाईबाबत सांगत आहे. त्यामुळे लाेकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. रस्त्यावर कुठेही वाहने उभी केली, तर पोलिस उचलून नेतात, अशी भीती लोकांमध्ये पसरत आहे. चार-पाच महिन्यांनंतर रस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रमाण कमी होईल, असा मला विश्वास आहे.'' शिवाठाकूर, पोलिसनिरीक्षक, वाहतूक शाखा

दररोज होते २५ ते ३० वाहनांवर कारवाई
दोनमहिन्यांपासून शहरामध्ये टाेइंग मशीनचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. गाड्या उचलण्यासाठी आणि उतरवण्यासाठी माणसेच असल्यामुळे दिवसभरात २५ ते ३० वाहनांवर कारवाई होते. टोइंग मशीन कोणत्याही रस्त्यावर जात असल्यामुळे अनेक अस्ताव्यस्त वाहने उचलल्या जात आहे. शिस्त लागावी यासाठी वाहनधारकांचा विरोधही पूर्वीच्या तुलनेत मवाळ झाला आहे.