आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Railway Station Security Issue, Divya Marathi

रेल्वेस्थानक बनले असुरक्षित!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- चेन्नईतील रेल्वेस्थानकावर झालेल्या स्फोटानंतर रेल्वेस्थानकांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाजावाजा व कोट्यवधीचा खर्च करत साकारण्यात आलेले शहरातील दोन्ही रेल्वेस्थानक मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेपासून कोसो दूर आहेत. देशातील असुरक्षित रेल्वेस्थानकांचे ते ‘मॉडेल’ ठरले आहे. दरदिवशी हजारो प्रवासी या ठिकाणाहून ये-जा करतात, मात्र या मॉडेल स्टेशनच्या सुरक्षेच्या पुरत्या चिंधड्या उडाल्या असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या चमूने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे.
चेन्नईतील स्फोटानंतर ‘दिव्य मराठी’ने येथील रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. रेल्वेस्थानक भिकार्‍यांचे विर्शांतीस्थान बनले आहे. दक्षिण रेल्वेच्या स्थानकाच्या सुरक्षेचा तर पूर्ण बोजवाराच वाजला आहे. मेटल डिटेक्टरचा वापर होताना कुठेही दिसत नाही. मध्य रेल्वेच्या स्थानकात लगेजची तपासणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे स्कॅनिंग मशीन स्थानकावर आहे. पण, ते नादुरुस्त आहे.
दोन्ही रेल्वे स्टेशन मिळून सात फलाट आहेत. मात्र, मध्य रेल्वेस्थानकाच्या तिकीट घराच्या बाजूने असलेल्या साहित्याची ने-आण करण्यासाठी असलेल्या ठिकाणावरून प्रवासी ये-जा करतात. यातून कोणीही, कधीही, कसेही रेल्वे स्टेशनवर प्रवेश करू शकतो. अशीच स्थिती अकोटफै ल परिसराकडील असलेल्या रेल्वे फलाटांची आहे. लांब पल्ल्यावर चालणार्‍या रेल्वेगाड्या फलाटावर ये-जा करत असतात. अशा वेळी त्या गाड्यांना सुरक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, त्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सुरक्षा व्यव्सथा चांगली करणे गरजेचे आहे.